Saturday, May 2, 2026
HomeBreakingब्रेकिंग : “वासू" के गिरे आसू....!” 

ब्रेकिंग : “वासू” के गिरे आसू….!” 

Ajay Kandewar,Wani:-वणीतील शेतकऱ्यांची ओळख असलेली द वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. ता. 29 डिसेंबरच्या रात्री जिनिंग परिसरात एक धुंदीत असलेला आणि दुसर साध्या स्थितीत असलेला अचानक आमनेसामने आल्याने वातावरण तापल्याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे.

काय बोलायचं… आणि किती बोलायचं… याचा अंदाज सुटल्याने “वासू के गिरे आसू!” अशीच प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.चर्चेनुसार, “त्या वासू”कडून शब्दांची उधळण जरा जास्तच झाली, आणि त्यात भर म्हणजे “वासू साहेब” त्या वेळी “खूप सुंदर” अवस्थेत होते, अशीही कुजबुज वणीत कानावर पडतेय.

आमनेसामने येताच आधी नजरेतून ठिणग्या उडाल्या, मग शब्दांची देवाणघेवाण झाली आणि पाहता पाहता राडा चांगलाच रंगला, अशी चर्चा जिनिंगपासून चहाच्या टपरीपर्यंत सुरू आहे.घटना नेमकी काय, कोण बरोबर कोण चुकलं.यापेक्षा “वासू के गिरे आसू” ही ओळच सध्या वणीची राजकीय टॅगलाईन बनली आहे.त्या वासुचे “धुंदीत शब्द सुटले, पण चर्चा मात्र शुद्ध वणीत पसरली!” “जिनिंगमध्ये कापूस नाही, पण त्या रात्री वाक्यांची गाठोडी भरपूर निघाली.सध्या तरी ही संपूर्ण घटना ‘कुजबुज’ यापुरतीच मर्यादित असली, तरी वणीतल्या चर्चेत “शब्द जड झाले की आसू आपोआप गळतात… वासू के गिरे आसू.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page