Wednesday, July 15, 2026
HomeCityवणीत ‘निधी आपके निकट’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वणीत ‘निधी आपके निकट’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Ajay Kandewar, Wani :कामगार-कर्मचाऱ्यांच्या हक्कांची माहिती आणि तक्रारींच्या थेट निवारणासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) अकोला क्षेत्रीय कार्यालयातर्फे वणी येथे ‘निधी आपके निकट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी येथे दिवसभर चाललेल्या या उपक्रमाला परिसरातील कामगार, कर्मचारी व पेन्शनर्सचा मोठा प्रतिसाद मिळाला.

अकोला क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी संतोष पोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ईडीएलआय विमा योजना तसेच नवीन एम्प्लॉईज एनरोलमेंट स्कीमबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नियोक्ता व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या, सेवा व कायदेशीर हक्क यावरही प्रकाश टाकण्यात आला.यावेळी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती देण्यात आली. नवीन कर्मचाऱ्यांना डीबीटीद्वारे वेतन सहाय्य, तसेच नियोक्त्यांना प्रतिमहिना प्रोत्साहन स्वरूपात मिळणाऱ्या लाभामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.कार्यक्रमात कामगार, कर्मचारी व पेन्शनर्स यांच्या विविध तक्रारी ऐकून त्यांचे जागेवरच निवारण करण्यात आले. उपक्रमामुळे ईपीएफओच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

या कार्यक्रमाला अकोला येथील क्षेत्रीय कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी संतोष पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, कामगार कायदे तज्ज्ञ भालचंद्र चांदे, प्राचार्य प्रशांत गोडे, रॉकवेल मिनरलचे एच.आर.हेड हुसैन बाशा, तसेच ई.पी.एस. वणी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष मारोती मोडक उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page