Ajay Kandewar,वणी :- वणी पोलिस ठाणे हद्दीतील गजानन नगरी येथे घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खुनाचा गुन्हा वणी पोलिसांनी केवळ २४ तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे.प्रेमिकेच्या अनैतिक संबंधांमुळे तिच्या पतीचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती स्वप्निल राऊत (वय २६) याचा तिचा प्रेमी सुनील टेकाम (२४, रा. वडजापूर) आणि त्याचा साथीदार सौरभ मारोती आत्राम (२६, रा. वणी) यांनी केला.दोन्ही आरोपींनी दारू पार्टीच्या बहाण्याने स्वप्निलला बोलावले आणि मुद्दाम अधिक प्रमाणात दारू पाजली. त्यानंतर आरोपी सुनीलने मोठा दगड घेऊन स्वप्निलच्या डोक्यावर वार केला. स्वप्निल मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी आरोपींनी दारूची बाटली फोडून त्याचा गळा चिरला. त्यानंतर दोघेही आरोपी बाईकवरून घटनास्थळावरून पसार झाले.ही घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली होती.

मात्र LCB व पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि माहितीच्या आधारे २४ तासांत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. गुन्ह्याच्या तपासात उपनिरीक्षक सुधाम आसोरे, स्थानिक क्राइम ब्रांचच्या टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

