Friday, November 27, 2026
HomeBreakingखळबळ पॉलिटिक्स @ "ऑपरेशन टायगर"ची वणीत एन्ट्री? शिंदे सेनेच्या रडारवर मोठा नेता;...

खळबळ पॉलिटिक्स @ “ऑपरेशन टायगर”ची वणीत एन्ट्री? शिंदे सेनेच्या रडारवर मोठा नेता; जिल्हा परिषद निवडणूकीनंतर ऑपरेशन फतेह…

Ajay Kandewar,वणी : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या राजकीय खेळाला पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे दिसत असून, आता शिंदे सेनेच्या संभाव्य ‘ऑपरेशन टायगर ‘ची चर्चा वणीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संजय देशमुख यांची शिंदे गटातील एन्ट्री झाल्यानंतर आता शिंदे सेनेची नजर वणीतील दोन बड्या राजकीय नेत्यांवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे . तेही जवळकीचा असल्याचेही बोलल्या जात आहे.विशेष म्हणजे, एका मोठ्या राजकीय गटासह प्रभावशाली नेत्याच्या पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवली जात असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वणीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या चर्चांमधील नेमका मोठा नेता कोण? शिंदे सेनेच्या गळाला खरोखरच एखादा ‘टायगर’ लागणार की अखेर मांजरावरच समाधान मानावे लागणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.

दरम्यान, या संभाव्य राजकीय उलथापालथीमुळे मतदारांमध्येही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या काळात जनतेकडून मतांच्या रूपाने आशीर्वाद घ्यायचे, जनतेचा विश्वास संपादन करायचा आणि निवडणुकीनंतर सत्तेच्या समीकरणानुसार पक्ष बदलायचा, ही राजकीय संस्कृती नेमकी कितपत योग्य? मतदारांनी दिलेल्या मतांचा नैतिक आधार घेऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षांतर करताना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे नाही का? आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात आणि परवा पुन्हा नव्या राजकीय तंबूत, अशा पक्षांतराच्या खेळात सामान्य मतदारांच्या मतांचे मूल्य नेमके किती उरते, हा खरा प्रश्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वणीच्या राजकारणात पडद्यामागील हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, ऑपरेशन टायगर यशस्वी झाले तर काहींचे राजकीय गणित कोलमडणार, तर काहींच्या सत्तेच्या महत्त्वाकांक्षेला नवी दिशा मिळणार. मात्र, या राजकीय खेळात जनतेचा कौल महत्त्वाचा की सत्तेचा मोह, याचा फैसला मतदारच करतील

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page