Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsपिता शिंदे गटात... पुत्र भाजपात.....

पिता शिंदे गटात… पुत्र भाजपात…..

•वणीचा राजकारणाची “रंगतदार मॅच”. • BJP पुत्राला "Out" करणार की पुत्रच "Stump out" होणार?

Ajay Kandewar, Wani:वणीच्या राजकारणात पुन्हा एकदा “घराघरात पक्ष” अशी अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात आधी काँग्रेसचे ज्येष्ठ त्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य विजय चोरडिया यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत “शिंदे गटात” जाहीर प्रवेश केला आणि वणीच्या राजकारणात एक मोठा स्फोट घडवून आणला.

विजय चोरडिया यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला वणीसारख्या संवेदनशील मतदारसंघात ताकद मिळाली असली, तरी दुसरीकडे त्यांच्या घरातूनच नव्या राजकीय गुंतागुंतीला सुरुवात झाली आहे. कारण पिता शिंदे गटात पण पुत्र भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल चोरडिया, हे विजयभाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र असून ते आजही भाजपच्या पायावर ठामपणे उभे आहेत.आगामी निवडणुकीसाठीही त्यांनी तयारी सुरू केल्याची माहिती आहे.म्हणजेच, एकाच घरातून दोन वेगळ्या झेंड्याखाली राजकारणाची “रंगतदार मॅच” सुरू झाली आहे.

घरात दोन पक्ष, बाहेर दोन फ्रंट….

 

शिंदे गटात प्रवेशानंतर विजय चोरडिया नगरपरिषदेच्या रणधुमाळीत शिंदे गटाच्या आघाडीवर असतील, तर त्याच घरातील पुत्र कुणाल भाजपाच्या बाजूने प्रचाराच्या मोहीमेत उतरणार अशी चर्चा राजकीय गल्लीबोळांत रंगली आहे.यामुळे वणीचे राजकारण आता “घरगुती संघर्षा”कडे झुकत असल्याची चर्चा आहे.वणीतील राजकीय वर्तुळात या प्रसंगावरून भन्नाट टोमणे चालू झाले आहेत.एकाच घरात शिंदे गट आणि भाजप….म्हणजे सकाळी “शिंदे” आणि संध्याकाळी “कमळ”.राजकारण आता इतकं घराघरात आलंय की झेंड्यांवरूनच नातेसंबंध ओळखावे लागतील.आता सर्वांच्या नजरा आहेत त्या भाजपाच्या जिल्हा नेतृत्वावर भाजप पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्याचा पुत्र कुणाल चोरडिया यांना कायम ठेवणार का?की “पित्याचे पाऊल” गृहित धरून पक्षात नवीन समीकरण तयार करणार. हा प्रश्न सध्या वणीच्या राजकीय गल्लीबोळात चर्चेचा “टॉप ट्रेंड” बनला आहे. पिता शिंदे गटात, पुत्र भाजपात…हा फक्त कौटुंबिक तणाव नाही, तर वणीच्या राजकारणातील नव्या “राजकीय गणिताचा” पहिला धक्का आहे.आता पुढे “रंगतदार मॅच ” मध्ये Out होणार की स्वतः पक्षातून Stump Out होणार हेच वणीकरांना दिवाळीच्या फटाक्यांपेक्षाही जास्त उत्सुकतेचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page