Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsवणी उपविभागात बोगस ठेकेदारांचा “राजा बाजार....."

वणी उपविभागात बोगस ठेकेदारांचा “राजा बाजार…..”

• अवाढव्य बिलांची उचल,प्रशासनाची मौनसंमती? • "विदर्भ न्यूज" दाखविणार आता "ठेकामाफियांचा भोंगळ" क्रमशः 

Ajay Kandewar,Wani:- वणी उपविभागात बोगस ठेकेदारांचा ( एकाच नावे काम दुसऱ्याचे नावे बिल) असा सुळसुळाट वाढत चालला आहे. सरकारी योजनांचे टेंडर कागदोपत्री नामांकित असले तरी, प्रत्यक्षात काम करणारे “गावठी ठेकेदार” आणि “दलाल ठेकेदार” यांचीच मजल चालतेय आणि आश्चर्य म्हणजे जिल्हा परिषद ,पंचायत समिती प्रशासन त्यावर मौन बाळगून बसले आहे.

विविध योजनांच्या नावाखाली लाखो रुपयांचे टेंडर काढले जातात, पण गावात नळातून ‘हवा’ येते, पाणी नाही. पाइपलाईन अर्धवट, वाल्व गायब, आणि बिल मात्र पूर्ण. अशा “भुताटकी कामां”ना मूकसंमती देणाऱ्या अभियंत्यांचा तपास कधी होणार?गावकऱ्यांना त्रास, ठेकेदारांना पैसा, आणि प्रशासनाला ‘शेअर’ एवढंच समीकरण उरलंय.

PWD – रस्ता नाही, पण मोजमाप पूर्ण,•विकासाच्या नावाखाली बोगस बांधकामं….

हे ठेकामाफीया कागदावर मोठ एस्टिमेट रस्ता असो, नाली असो, इमारत असो प्रत्यक्षात फक्त सर्वकाही कमी दिसतो. उरलेला रस्ता फाईलमध्येच ‘manage’ होतो.ठेकेदार आणि अधिकारी यांची संगनमत जणू नवा ठेका “काम अर्धं, बिल पूर्ण ”जनतेच्या पैशावर हा खेळ रोज खेळला जातो, पण कोणालाच जबाबदारी नाही.नाली,पांदण रस्ता, सिमेंट रस्ते, शाळेचा बिल्डिंग, शौचालय योजना असो, अंगणवाडी बांधकामं असो किंवा स्मशानभूमीचा ओटा प्रत्येक ठिकाणी “बोगस ठेकेदार” आणि “कागदी मोजमाप” यांचा कहर आहे.संपूर्ण गावात फोटोसाठी काम, उपयोगासाठी फसवणूक.अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय हे शक्यच नाही. म्हणजेच, ‘बोगस ठेकेदारांना’ मिळते प्रशासनाची थेट पाठराखण.

•कृषी व जलसंधारण विभाग – योजनांतून उत्खननाचा उतारा

तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, बांधकाम — सगळं काही “कागदावरच”. प्रत्यक्षात ठेकेदार जेसीबीने तीन फेऱ्या मारून काम पूर्ण दाखवतो. निरीक्षक फोटो घेतो, आणि ठेकेदाराच्या खात्यात लाखो जमा.‘कामाच्या ठिकाणी माती, खात्यावर माया’अशी परिस्थिती झाली आहे. कुठे तर पोल उभा नाही, तरी बिल बनलेले! वायरिंग अर्धवट, पण खर्च पूर्ण दाखवलेला. ठेकेदाराला पैसे आणि गावकऱ्यांना अंधार.प्रशासन फक्त “कागदावरील प्रकाशयोजना” दाखवून खूश.प्रशासनाने कारवाई न केल्याने हे ठेकेदार दिवसेंदिवस बिनधास्त झाले आहेत. टेंडर प्रक्रियेत फिक्सिंग, फोटो मोजमाप, बनावट बिलं, आणि राजकीय लागेबांधे या चौकडीने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे.यावर लोकप्रतिनिधीही गप्प, कारण ठेकेदार म्हणजेच त्यांचे ‘आर्थिक भांडार’.म्हणावं लागेल.प्रश्न उरतो “जनतेचे पैसे कुठे जातायत? करदात्यांच्या पैशावर सुरू असलेला हा ‘ठेकामाफिया’ अखेर कोणी उघड करणार? प्रशासन स्वतः दोषी ठरल्यास तपास कोण करणार? आणि जनतेचा प्रश्न “बोगस ठेकेदारांच्या राजवटीत विकास कधी दिसणार?

•विदर्भ न्यूज करणाऱ या “ठेकामाफियांचा” भांडाफोड….

“विदर्भ न्यूज” यावर वाचा फोडणारे हे तर नक्कीच आहे येत्या क्रमशः  बोगस ठेकामाफिया संदर्भ संपूर्ण माहितीसह यांच्या कामाची बोगस पावती जनतेसमोर विदर्भ न्यूज ठेवणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page