Vidharbh News -अजय कंडेवार,वणी :- वणी परिसरातील लालपुलीया परिसरातील FCI कोल डेपोला अचानक भीषण आग (Fire)लागल्याची घटना घडली.Lalpuliya wani Fire control of coal in the wild.
प्राथमिक अंदाजानुसार ही आग उष्णतेमुळे(Sunlight ) लागल्याचे बोलले जात आहे. अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्या आसपास कोळसा जळून राख झालाय. या आगीवर अखेर अग्निशमन दलाच्या पाच बंबातून फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. यात अंदाजे 40 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तेथील वरिष्ठ कर्मचारी कर्मचारीवृद,अग्निशमन दलाने ती आग आटोक्यात आणण्यात अथक परिश्रम केले. विशेष बाब म्हणजे कोळसा आतमधून काही प्रमाणात चांगले बाहेर निघत असल्याचीही माहिती समोर आली आहे.