Vidharbh News -अजय कंडेवार ,वणी:- तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात फ्री मेथॉडिस्ट राजूर चर्चचा ख्रिस्त बांधवांनी रविवार (31 मार्च रोजी ) “ईस्टर संडे” अर्थात ‘प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस’ खिश्चन समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. Easter Sunday” traditional prayer at the mausoleum for 61 years.In Vidarbha the tradition continues only at Rajur….
तालुक्यातील राजूर गावातील शेकडो ख्रिस्त समाजबांधवांनी समाधीस्थळातील प्रांगणात प्रातःकाल भेट देत तेथील सर्व समाधीना पुष्पहाराने सजविण्यात आले. संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच प्रात:कालची प्रार्थना समाधीस्थळातील प्रांगणात मागील 61 वर्षापासून होत आहे, हे विशेष उल्लेखनीय ! दरम्यान, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाल्म संडे,गुड फ्रायडे ला दिंडी आणि शांतीयात्रा यावेळी अतिशय उत्साहात करण्यात आली. मागील रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात ‘पाल्म संडे’ अर्थात झावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला.तसेच “उत्तम शुक्रवारी” येशू ख्रिस्ताला मानव जातीचा उद्धारासाठी वधस्तंभावर खिळन्यात या त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूने क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात (29 मार्च रोजी) गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार (31 मार्च रोजी) येशूच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. फ्री मथोडीस्ट चर्च राजूर कॉलरी येथील पास्टर रेव्ह.शामूवेल शालूरकर यांनी ईस्टर डे निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. यावेळी चर्चच्या युवक,युवकांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. शेवटी फ्री मेथोडीस्ट प्रांगणात भोजनविधीही चर्चचा बांधवांतर्फे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता चर्च कमिटीचे अध्यक्ष, समस्त कमिटी सदस्य,युवा कमिटी,महिला कमिटी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
“देशात चालत असलेल्या घडामोडीसाठी प्रातःकालीन प्रार्थना रविवारी पहाटे सहा वाजता प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त समाधीस्थळातील प्रांगणात राजूरचे फ्री मथोडीस्ट चर्चचे समस्त सदस्य उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ राजूर या गावातच होते, हे उल्लेखनीय! यावेळी पुनरुत्थान झालेल्या येशुकडे देशात होऊ घातलेल्या निवडणुकीबद्दल, राजकीय सामाजिक व आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या राजूर गावातील चर्च मध्ये ईस्टर संडे निमित्त आनंदाचे वातावरण पसरले होते.