Wani:- CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला, या निकालात वणी येथील जिणेशा महेंद्र लोढा या विद्यार्थिनीने 97.40 टक्के गुण घेत वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला.
जिणेशा ही शहरातील SIS येथील विद्यार्थिनी होती.तिने आपल्या यशाचे श्रेय आई- वडिलांना दिले आहे, विशेष बाब म्हणजे जिणेशा चे वडील डॉ . महेंद्र लोढा हे वणी उपविभागात नामांकित डॉक्टर आहे. जिणेशा ला अभ्यासात ज्यावेळी समस्या उदभवायची त्यावेळी आई-वडील त्याचे शिक्षक बनून तिला अभ्यासात सहकार्य करायचे. या यशाचे श्रेय आई, वडील व गुरुजनांना देत आहे.