अजय कंडेवार,Wani:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) वणी उपविभागातील तडफदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेले यवतमाळ सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. ऐन विधानसभा धामधुमीतच हा नगराळे यांचा राजीनामा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नगराळे यांनी एक राजीनामा पोस्ट करुन जणू जिल्ह्यातील राजकारणात खळबळच माजली आहे. विशेषतः हा राजीनामा त्यांनी पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने दिला असावा ? अश्या चर्चेला ऊत येऊ लागले.Resignation of District President Vijay Nagarle.
हल्लीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी महाविकास आघाडी मध्ये राहून वणी उपविभागात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अनेक ठिकाणी स्वतः काहीं कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार सभाही घेतल्या होत्या.तसेच महविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रत्येक सभेत नगराळे यांची विशेष उपस्थिती होती. विजय नगराळे यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने मोठी जबाबदारी टाकली होती. त्यामुळे नगराळे हे नेहमीच पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून कामाची आखणी करून पूर्ण करायचे.गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर विजय नगराळे हे शरद पवार गटासोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर मोठी जबाबदारीही टाकली होती. त्या जबाबदारीने त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी ही निर्माण केली होती.मात्र,बुधवारी त्यांनी अचानक पदांचा राजीनामा दिला. पक्ष वरिष्ठांना आपल्या राजीनाम्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अनेकदा वणी तालुक्यात विजय नगराळे पक्षाचा झेंडा हातात घेऊन कार्य करतांना काहीं पदाधिकारीही आळे फाटे आणायचे अशीही बोंब आहे. त्यामुळेचे जणु काही हा राजीनामा नाट्य रंगले असावे अशीही खमंग चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत जवळ आले आहे आणि पक्षातील अंतर्गत वाद बाहेर येत असल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटात नाराजीचा सूर उमटत आहे. या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी काय विचार करतील हे येणारा काळ सांगेल…