अजय कंडेवार,Wani:- मुंगोली गाव पुनर्वसाहत स्थळ कुर्ली येथे जागा घोषित करून 4 वर्षे उलटून जात आहे परंतु वसाहतीच्या जागेवर कुठल्याही सुविधा नसल्याने मुंगोली गाव पुनर्वसाहत स्थळ येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता 15 मार्च रोजी पुनर्वसन समिती अध्यक्ष यवतमाळ (महाराष्ट्र) तथा जिल्हाधिकारी यांना मुंगोली गावकऱ्यांनी काहीं मागण्या करीत निवेदनाद्वारे साकडे घातले.Collector sir, first provide basic facilities in the resettlement area.Tahoe of Mongolian villagers.
मुंगोली गाव पुनर्वसाहत स्थळ कुर्ली येथे जागा घोषित करून 4 वर्षे उलटून जात आहे परंतु वसाहतीच्या जागेवर कुठल्याही पद्धतीचा नागरिकांच्या हिताचे त्यांना जीवन आवश्यक गरजा उपलब्ध नसताना दि. 14/03/2024 ग्रामसभा WCL कडून घेण्यात आली व 5 एप्रिल भूखंड वाटप करण्यात येत आहे असे घोषित केले विशेष म्हणजे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाही ते लोक तिथे काय करणार उदा. रस्ते पाणी वीज नसताना त्या लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम वेकोलीकडून करण्यात येत आहे.नागरिकांकडून होत असलेल्या काही मागण्या१)पुनर्वसाहत स्थळ येथे मूलभूत सोयी सुविधा पाणी, वीज पुरवठा, रस्ते करण्यात यावे.२)प्रकल्पांतर्गत बाधित मुंगोली पुनर्वसन करून त्या गावाला वास्तव करण्यात येत आहे गावाला शासनाच्या राजपत्र प्रमाणे महसुली दर्जा देण्यात यावा.३) पुनर्वसाहत स्थळी भूखंड वाटप करून उर्वरित जागा ग्रामपंचायतच्या मालकीची करून देण्यात यावी त्यांचे कारण भविष्यात गावाला येणाऱ्या योजना ही ग्रामपंचायत मालकीची जागा नसल्यामुळे गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही.४)वेकोली कडून पुनर्वासाहत झाले उदा. निलजड़, बेलोरा या गावाला भूखंड नागरिकांना देण्यात आला त्यांचे अजूनही भोगदार वर्ग 1 करून देण्यात आला नाही त्या गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहेतसेच त्या ठिकाणाचे 91 फ्लॅट धारकांना भोगवटदार वर्ग -1 नमुना आठ करून देण्यात यावा५)कोल बेरिंग ऍक्ट मध्ये पुनर्वसाहत जमीन कुर्ली येथे घेण्यात आली नाही तर ती जमीन खाजगी घेण्यात आली व प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्लॉट ऐवजी 3 लक्ष रुपये कंपनीने काटण्यात आले व त्याच लियौश्चत विक्री करून मालकी हक्काचे करून देण्यात यावे.६)पुनर्वासात स्थळाला लागलेला कुर्ती गाव त्या गावाची सम्शान भूगी पुनर्वसाहत ला लागून असल्यामुळे ते जोळण्यात यावी व (ग्रामपंचायत प्रमाणपत्र त्यांच्या अटी शर्तीचे जोडण्यात येत आहे) ते कंपनीने मान्य करून देण्यात यावी ,उदा. खडीकरण , डांबरीकरण रस्ता,त्या स्थळाचे शुशोभीकरण करून देण्यात यावे. मागण्या करण्यात येत आहे.
विशेषतः स्वतःपुनर्वसन समिती अध्यक्ष यवतमाळ (महाराष्ट्र) तथा जिल्हाधिकारी असताना लोकांचा गरजा पूर्ण करू शकत नाहीं.लोकशाही देशात जर अशी परिस्थिती येत असेल तर दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न ग्रामस्थांना उपस्थित होत आहे. त्याकरिता स्वतः जिल्हाधिकारी यांनी नागरिकांचा प्रश्नांना लक्ष घालून समस्या सोडवाव्यात. अशी गावकऱ्यांची आर्त हाक सूरू आहे. यावेळी निवेदन देताना आयुष ठाकरे, बाबाराव ठाकरे, अक्षय बल्की, पवण अतकरे, अन्नाजी तुमाने व दत्तात्रय खाडे आदि उपस्थित होते.