अजय कंडेवार,Wani -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात वणी विधानसभा प्रमूख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली देरकर निवासस्थानी अनेक मुस्लिम तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय भवानी… जय शिवाजी च्या घोषणेने युवासेनेत प्रवेश केला.In Wani, Muslim youths join Yuva Sena chanting “Jai Shivaji”
निवडणुक बिगुल वाजताच अनेक राजकिय बदल व्हायला सुरूवात झाली आहे.विधानसभा मतदारसंघात युवकांचा युवासेनेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे. वणी विधानसभा प्रमुख संजयभाऊ देरकर यांनी शिवसैनिक यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा पक्षाला नवी संजीवनी देऊ असे या पक्ष प्रवेशात सांगितले.तसेच “युवापिढी ही उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झाली असून येत्या काळात हजारो युवक प्रवेश करणार असल्याचे सांगितले.yuvasena….
यावेळी आकाश पेंदोर, मयूर निब्रत,वाशिम शेख, प्रकाश कांबळे, अशपाक शेख, तौसिफ खान,अक्षय पथाडे, तौसिफ शेख, विजय पेंदोर, विफेश साळुके, उमेश नरपांडे, आकाश मदाकलवार, पक्षाचे गौतम सुराणा,जगन जुनगरी, विनोद दुमने, संतोष राजूरकर, हरी कार्लेकर, शिवराज दुमणे,चेतन उलमाले, ऋषी काकडे, प्रशांत बल्की यांची प्रमुख उपस्थिती होती.विशेषतः युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी सुधिर ठेंगणे, रवि बोढेकर यांचा प्रमूख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.Wani Yuvasena