अजय कंडेवार,वणी:- देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपुर लोकसभेकरीता वणी मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांनाच तिकीट देण्याबाबतची विशेष एक सभा १३ मार्च ला जिल्हा मध्यवर्ती बँक,वणी येथील सभागृहात एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आदि मित्र पक्ष पदाधिकारीही सहभागी झाले होते.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने विजय मिळवला. मागील काळात त्यांचे दुखद निधन झाले. त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांचा विकासाचा ध्यास पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या भागामध्ये त्यांच्या प्रति अत्यंत चांगली प्रतिमा आणि उत्साही लाट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो. म्हणून चंद्रपुर लोकसभेकरीता वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या टाहो सूरू आहे.Only Pratibha and Dhanorkar should be given Lok Sabha candidate.
या सभेत देविदास काळे, संजय खाडे, टिकाराम कोंगरे,विजय नगराळे,वंदना आवारी, मोरेश्वर पावडे, पुरूषोत्तम आवारी , विवेक मांडवकर, यासह आदि महाविकास आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते