अजय कंडेवार,Wani:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकांनी सव्वा किलो गांजा पकडून गांजा विक्री करणाऱ्याला एकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर नारायण पत्रीवार 43 वर्षे रा. पाटणबोरी ता. पांढरकवडा जि. यवतमाळ याच्याकडुन 5.271 किलोग्रॅम गांजा अंदाजे कि. 63हजार 576 रु चा माल जप्त करण्यात आला आहे.
पाटणबोरी येथील शिवाजी चौक येथे राहणारा इसम नामे गंगाधर पत्रीवार हा त्याचे राहते घरात अवैधरित्या गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करीता बाळगुन आहे. अशा माहिती वरुन वरिष्ठांचा मागदर्शनात गंगाधर नारायण पत्रीवार वय 43 वर्षे रा. पाटणबोरी याचे राहते घरात घरातील एका खोलीत पांढरे रंगाचे प्लास्टीक कट्टयात हिरवट काळपट ओलसर गांजा यात फुले,बिया ,पाने व वनस्पतीची शेंडे असलेला असा एकुण 5.271 ग्राम किमंत 63 हजार 576 रू रु. माल जप्त करण्यात आला असुन गंगाधर नारायण पत्रीवार 43 वर्षे रा. पाटणबोरी ता. पांढरकवडा जि. यवतमाळ याचा विरुध्द पो.स्टे. पांढरकवडा येथे एन.डी.पी.एस अंतर्गत गुन्हा नोंद करुन पुढील कारवाई करीता पो.स्टे.चे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठांचा मार्गदर्शनात P.I आधारसिंग सोनोने ,दिनेश झांबरे , PSI रामेश्वर कांडुरे,सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत, किशोर आडे, छंदक मनवर व तुकाराम जंगवाड यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.