Ajay Kandewar, वणी :- वणी तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली वसंत को-ऑप शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी लि,वणी पुन्हा एकदा राजकीय हालचालींनी हादरली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या कार्यालयातून ३ नोव्हेंबर रोजी जारी झालेल्या आदेशानुसार विद्यमान अध्यक्ष आशिष आनंदराव खुलसंगे यांच्या कार्यकाळावर अविश्वास ठराव निश्चित करण्यात आला आहे.
हा आदेश सहकार क्षेत्रात वणी-तालुका पातळीवर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. 13 सदस्यांच्या एकमताने घेतलेल्या या निर्णयामुळे खुलसंगे गटाचे समीकरण पूर्णपणे कोलमडले आहे. फॅक्टरीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेद आणि सत्तासंघर्षाला अखेर अधिकृत शिक्कामोर्तब मिळालं आहे.या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे 13 सदस्य एकत्र आले तर फक्त एकटाच आशिष खुलसंगे अलिप्त राहिला. सहकारातील ही आकडेवारीच सांगते की, फॅक्टरीतील सत्ता आता नव्या हातात जाणं निश्चित झालं आहे.गेल्या काही काळापासून संचालक मंडळात निर्माण झालेल्या नाराजीच्या वातावरणाला अखेर उघडपणे वाचा फुटली आहे. आशिष खुलसंगे यांच्यावरील आंतरिक असंतोष आणि निर्णयप्रक्रियेतील एकाधिकारशाही याचा परिणाम या ठरावातून स्पष्ट दिसतो.दुसरीकडे गैरखुलसंगे गटात उत्साहाचं वातावरण आहे. सहकार हे वैयक्तिक मालकीचे नाही, तर सर्व सदस्यांचे आंदोलन आहे, असे म्हणत नव्या नेतृत्वाने पारदर्शकता, सामूहिक निर्णयप्रक्रिया आणि सदस्यहित यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या घडामोडीनंतर वणी तालुक्यातील सहकारी क्षेत्रात नवा पायंडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा उपनिबंधकांचा निर्णायक आदेश
जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (१)(३) अन्वये हा आदेश जारी केला असून, मिळालेल्या नोटिसांनुसार विशेष सभेची अधिकृत बोलावणी करण्यात आली आहे.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात विशेष सभा होणार असून, या सभेतच अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब अपेक्षित आहे
आशिष खुलसंगे यांचा Game ओव्हर….!
वणीच्या सहकारी राजकारणात हा निर्णय म्हणजे मोठा टर्निंग पॉइंट ठरत आहे. १३ सदस्यांच्या एकमताच्या भूमिकेनंतर ‘ आशिष खुलसंगे यांचा Game Over’ अस राजकारणात याचे परिणाम दूरगामी असतील अशी चर्चा रंगली आहे.आगामी काळात या फॅक्टरीच्या नव्या संचालक मंडळावर कोणाचे नेतृत्व राहणार, हा प्रश्न मात्र अद्याप खुलाच आहेवणीच्या सहकारातली ही उलथापालथ केवळ एका संस्थेपुरती मर्यादित नाही; तर ती सहकारी व्यवस्थेत सदस्यांच्या आवाजाला पुन्हा बळ देणारी ठरते आहे.

