Ajay, Wani :- शहरातील लाल पुलिया – मेघदूत परिसर सध्या एफसीआय कोल प्लॉटमध्ये ये-जा करणाऱ्या ट्रकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे त्रस्त झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून एफसीआय कोल प्लॉटसमोर ट्रकांच्या रांगा लागल्या असून, सार्वजनिक रस्ताच जणू खासगी पार्किंग बनल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रक उभे असल्याने दुचाकीलाही वाट मिळत नाही. धूळ, प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साध्या दुचाकी चालकाला वाट धरून चालत असतांना मनात एकच सवाल येतो की “साहेब, हा रस्ता यांच्या बापाचा आहे का?
लालपुलिया परिसरात मेघदूत कॉलनीचा रस्त्यावर एफसीआय कोल प्लॉट आहे.या प्लॉट मध्ये जाणाऱ्या आणि तेथून बाहेर पडणाऱ्या ट्रकांची कोणतीही शिस्त दिसून येत नाही. सार्वजनिक रस्त्यावर सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत तासन्तास ट्रकांची रांगच रांग उभी असते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ट्रक उभे राहत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या हरामखोरांनी रस्त्याचा वापर स्वतःच्या ताब्यातील जागेसारखा करू नये, अशी संतप्त भावना नागरिकांकडून होत आहेत.
वणी वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा….
मात्र, या संपूर्ण प्रश्नाकडे पाहताना एक बाब तितकीच महत्त्वाची आहे.P.I रणधीर यांनी वाहतूक शाखेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वणी शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे नागरिक मान्य करतात. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या पथकाची सातत्याने धडपड सुरू आहे. त्यामुळेच नागरिकांच्या जास्त अपेक्षाही त्यांच्याकडूनच वाढल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांची मागणी आहे की, लालपुलिया – मेघदूत परिसरातील एफसीआय कोल प्लॉट जवळील हा प्रकार अत्यंत संवेदनशील आहे .येथे विशेष मोहीम राबवून रस्त्यावर बेशिस्त उभे राहणाऱ्या ट्रकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सार्वजनिक रस्ता हा कोणाच्याही मालकीचा नसून सर्व नागरिकांचा आहे. त्यामुळे एफसीआय कोल प्लॉट परिसरात शिस्त प्रस्थापित करून PI रणधीर यांनी नागरिकांना दिलासा द्यावा.

