Ajay Kandewar, Wani :- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने आपल्या मिशन टायगर मोहिमेत महत्त्वाची चाल खेळली त्यात काँग्रेसमधील खंबीर नेतृत्व, युवकांची मोठी फळी आणि समाजात मजबूत पकड असलेले बंटी ठाकूर यांनी नुकताच धनुष्यबाण हाती घेत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश घेत ग्रँड एंट्रीच केली. कारण येत्या निवडणुकीचा काळात “बंटी ठाकूर – शिंदे सेनेच्या वणीतील “तुरुपाचा एक्का” ठरेल यात शंका नाही.

बंटी ठाकूर हे केवळ नावापुरते नेते नाहीत; तर कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधणारे, युवकांना बरोबर घेऊन चालणारे आणि प्रत्येक लढाईत आघाडीवर राहणारे मैदानावरचे खेळाडू आहेत. उपजिल्हाप्रमुख विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वणी शहरात विविध सामाजिक व राजकीय उपक्रम राबवले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला वणीमध्ये नवसंजीवनी मिळणार आहे. बंटी ठाकूर यांच्या मागे उत्साही युवकांची मोठी फळी आहे. त्यांची कार्यशैली पक्षनिष्ठ, संघटनशील व समाजाभिमुख असल्याने ते केवळ नेते नव्हे, तर संघटनेचे खरे शिलेदार मानले जातात. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात व मोहितकर यांच्या नेतृत्वाखाली बंटी ठाकूर आता शिंदे सेनेचे “फ्रंटलाइन वाघ” म्हणून सज्ज झाले आहेत. या
आजवर शिवसेनेची प्रतिमा उंचावणारे बंटी ठाकूर हे शिंदे सेनेसाठी तुरुपाचा एक्का ठरणार आहेत. त्यांच्या एकनिष्ठ कार्यपद्धतीमुळे वणी शहरात शिंदे सेनेची घोडदौड वेगाने होणार आहे, हे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. काहींची तंबूछावणी रिकामी होत असताना ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेचा उभारता मोर्चा आगामी निवडणुकीत वणी शहरात राजकीय गणित आणि नगरपरिषद निवडणूक गणित बिघडेल यात काहीं संशय नाही.

