Ajay kandewar ,Wani :- वणी नगरपालिकेची निवडणूक आता थेट नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत रूपांतरित झाली असून, संपूर्ण शहराचे राजकीय लक्ष या रणभूमीकडे खिळले आहे. ‘शिंदे गटा’ने दाखल केलेल्या 30 ही उमेदवारांवर विजयाचा मोठा विश्वास ठेवत या निवडणुकीत पूर्ण ताकदीने झेंडा रोवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यातही प्रभाग क्रमांक १० मध्ये अक्षय बोथरा आणि मीनाक्षी राजू साठे यांच्याकडे तरुणाईचा ओघ वाढलेला आहे आणि निवडून द्यायचे असे प्रभाग क्रमांक १० असे विशेष लक्ष ठरवण्यात आलेले आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

ऐनवेळी “शिंदे गट’ने शिवसेनेचा धनुष्यबाण विजय चोरडिया यांनी हाती घेऊन आपले सर्व यंत्रणा कामी लावत वणी विकास हाच उद्देश्य समोर ठेवून विजय शिलेदार मैदानात उतरविले आहे यात युवा नेतृत्व अत्यंत साधारण परिस्थितीची युवती कुमारी पायल तोडसाम यांना नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात उतरवले आहे. नगराध्यक्षपद ST जाहीर झाल्यापासूनच शिंदे गटा’च्या कार्यकर्त्यांमध्ये युवती कुमारी पायल तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मागणी होती, आणि ती पूर्ण झाल्याने शहरात ही उत्साह वातावरण आहे. तसेच ३० “विजय शिलेदार” मैदानात उतरताच त्यातले महत्त्वपूर्ण प्रभाग क्रमांक 10 ची जोडी “अक्षय बोथरा व मीनाक्षी राजू साठे” यांच्याकडे प्रत्येकांचं लक्ष वेधले गेलेले आहे यांच्या जोडीला सर्वांची पसंती मिळत आहे आणि उत्सुकतेच वातावरण प्रभाग क्रमांक 10 मध्ये चालत आहे.यामुळे, ही निवडणूक आता केवळ नगरपालिकेची न राहता, थे ‘प्रतिष्ठेची’ ही बनली आहे.
शिंदे सेनेचा दमदार नगराध्यक्ष….
कु.पायल तोडसाम यांच्या उमेदवारीमुळे वणीकरांसमोर एक दिशादर्शक पर्याय उभा राहिला आहे, असे मतदार सांगतात. कारण, कु.पायल तोडसाम हे उच्च सुशिक्षित असून त्यांना कामाचा अनुभव,मोठा जनसंपर्क आहे. या उच्च शिक्षणाचा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा फायदा निश्चितच वणी शहराच्या विकासाला होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ‘शिंदे गटाने’अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताच, कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला असून आता प्रचाराच्या कामाला वेग येणार आहे. आणि भरभरून शिंदे गटाच्या शिलादारांना जनता निवडून देईल असा ठाम विश्वास देखील अनेकांनी केलेला आहे कारण परिवर्तन हे महत्त्वाचं झालेलं आहे.


