Ajay Kandewar,Wani:- प्रशांत उर्फ छोटू निमकर यांची ओळख म्हणजे जनतेसाठी सदैव तत्पर असणारा, सर्वांना समान न्याय देणारा, कुणालाही दाराशी परत न करणारा खराखुरा लोकनेता. अनेक वर्षे जनतेच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहिल्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.याच जनसेवेच्या परंपरेला पुढे नेत, त्यांची अर्धांगिनी सोनाली प्रशांत निमकर या आज वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून भाजप पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जनतेसमोर उभ्या राहिल्या आहेत.
“पती प्रशांत उर्फ छोटू निमकर यांनी ज्याप्रमाणे जनतेचा विश्वास जपला, त्याच निष्ठेने आणि बांधिलकीने मीही काम करणार.”लोकांशी थेट संवाद, हसमुख स्वभाव, सर्वांना सहजपणे आपलेसे करणारी वृत्ती आणि समस्यांवर तत्काळ उपाय शोधण्याची तयारी या गुणांमुळे सोनाली निमकर या प्रभागातील मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. माजी नगरसेवक प्रशांत उर्फ छोटू निमकर यांना ज्या प्रकारे लोकांनी आपुलकीने आपला ‘प्रसाद’ मानून खांद्यावर घेतले, त्याच प्रकारे सोनाली निमकर यांनाही मोठा लोकसमर्थन मिळणार, अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.प्रशांत निमकर यांच्या नावावर असलेला विश्वास आणि सोनाली यांची नवी ऊर्जा हे समीकरण प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपसाठी प्रचंड अनुकूल वाऱ्याची चिन्हे दाखवत आहे.
स्थानिकांची प्रतिक्रिया….
“प्रशांत उर्फ छोटू ची सेवा पाहिली आहे… आता सोनालीवरही तसाच विश्वास ठेवणार आहे.प्रभागात जनतेची लाट स्पष्ट असून, येणाऱ्या निवडणुकीत भारी मताधिक्याने विजय मिळेल, अशी अपेक्षा आणि उत्सुकता नागरिकांमध्ये दिसत आहे.

