Saturday, October 24, 2026
HomeBreaking Newsवैयक्तिक व्याप आणि खाजगी कारणांमुळे प्रवीण खानझोडे यांचा उबाठा पक्षाला सोडचिठ्ठी.........

वैयक्तिक व्याप आणि खाजगी कारणांमुळे प्रवीण खानझोडे यांचा उबाठा पक्षाला सोडचिठ्ठी………

Ajay kandewar,Wani : वणी तालुक्यातील प्रवीण खानझोडे यांनी उबाठा पक्षाला रामराम दिला आहे. काही खाजगी कारणांमुळे पक्षकार्यात आवश्यक तितका वेळ देता येत नसल्याचे सांगत त्यांनी पुढील काळात सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवीण खानझोडे हे मूळचे बहुजन समाज पक्षाचे (बसपा) खंबीर पदाधिकारी म्हणून परिचित होते. स्थानिक राजकारणात त्यांनी बसपा संघटनेला बळकट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. नंतर उबाठा पक्षात प्रवेश करूनही त्यांनी विविध कार्यक्रम, सभा आणि जनसंपर्क मोहिमांत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या संयमित पण ठाम भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.मात्र, वैयक्तिक व्याप आणि खाजगी कारणांमुळे पक्षकार्यासाठी आवश्यक वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच त्यांनी पुढील राजकीय कामकाजातून स्वतःला मागे घेत पक्षाला रामराम केला आहे.

खानझोडे यांच्या या निर्णयाने वणी तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याचा हा निरोप आहे.काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या निर्णयाला वैयक्तिक कारणास्तव घेतलेलं योग्य पाऊल असे संबोधले आहे.उबाठा पक्ष ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्याच्या तयारीत असतानाच, खानझोडे यांच्यासारख्या जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्याच्या जाण्याने स्थानिक नेतृत्वाला नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे की नाही येता काळ नक्कीच सांगेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page