Saturday, October 24, 2026
HomeBreaking Newsशिवसेना (उबाठा) तर्फे भव्य महाआरोग्य शिबिर......

शिवसेना (उबाठा) तर्फे भव्य महाआरोग्य शिबिर……

•जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचे आयोजन.

विदर्भ न्यूज वणी | अजय कंडेवार : वणी विधानसभा आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उबाठा यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) तर्फे भव्य निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पुनवट येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होणार आहे.

या शिबिराचे आयोजन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्यांचीही या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे.

•शिबिरातील आरोग्य सेवा…

या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत निदान, शस्त्रक्रियेसंदर्भातील तपासण्या व उपचार करण्यात येणार आहेत. नोंदणी देखील पूर्णपणे मोफत असेल.

• तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी,•भरती रुग्णांसाठी मोफत एक्स-रे, रक्त, लघवी तपासणी, सोनोग्राफी,भरती रुग्णांना खाट शुल्क व जेवण मोफत,अतिविशिष्ट तपासण्या (सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. इ.) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत,महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नोंद असलेल्या रुग्णांना पूर्णपणे विनामूल्य उपचार,ईसीजी सुविधा उपलब्ध, महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी मोफत असणार आहे.

टीप:- 1. शिबिरात येताना आधार कार्ड तसेच केशरी/पिवळे रेशनकार्ड किंवा आयुष्मान कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.2. शिबिरानंतर पुढील १ महिन्याच्या कालावधीत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

संपर्क करण्याचे आवाहन…

संजय निखाडे – जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा), यवतमाळ. मोबाईल : ९४०५१५१२११,मुरलीधर उमाटे – वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता. मोबाईल : ९९२१११२९०३.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page