Ajay Kandewar,Wani:- उबाठा – काँग्रेसची काल (दि.५ नोव्हेंबर २०२५) वणी येथे झालेली बैठक चांगलीच तापली. एकीकडे उबाठा पक्षाचे अधिकृत आमदार संजय देरकर, खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत जागा वाटपावर चर्चा झाली, तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदावरून निर्माण झालेल्या रस्सीखेचेमुळे वातावरणात राजकीय उकळी निर्माण झाली.

बैठकीत “वणी नगराध्यक्ष कुणाचा?” या प्रश्नावरून काँग्रेस- उबाठा आतूनच बिघाड सुरू झाल्याचे बोलले जात आहे. उबाठा गटाला अध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार मिळाल्याने उबाठा गटाचे पारडे जड झालेत, आणि त्यात काँग्रेस एकटी पडल्याचे स्पष्ट चित्र उभे ठाकले आहे.जर हा रुसवा वाढला, तर ठाकरे गटाला फटका बसणार, काँग्रेसलाही झटका बसू शकतो आणि युती मात्र या गोंधळातून प्रचंड बळ मिळवू शकते. येत्या काळात आघाडी की बीगाडी, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे, या निर्णायक बैठकीत शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादीचे प्रतिनिधीच अनुपस्थित राहिल्याने चर्चेला अधिक तडका बसला आहे.राष्ट्रवादी का आली नाही? ही बैठक फक्त उबाठा आणि काँग्रेसची होती की आघाडीची हाही प्रश्न उपस्थित असून, काही कार्यकर्त्यांच्या मत असेही आहे की त्यांनी “वणी (पवारगट)राष्ट्रवादी यांनी या बैठकीसाठी स्वतःहून अंतर ठेवले होते का ”अशीही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर असे झाल्यास शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी नेमकं नगरपरिषद निवडणुकीत कोणाचं काम करणार “काँग्रेस” की “उबाठा” च यातही आता संभ्रम निर्माण झालेला आहे.
येत्या काही दिवसांत उबाठा – काँग्रेसची तसेच आघाडीतील सत्तासमीकरणांचे पान पुन्हा एकदा उलटण्याची चिन्हे आहेत. उबाठा – काँग्रेसची पहिली बैठक फिस्कटली असली, तरी पुढच्या टप्प्यात कोण कोणाच्या बाजूला उभे राहते हेच ठरणार उबाठाची काडी पेटतेय… आता पाहायचं “आघाडी विझते” का “युती उजळते”.

