Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील काही हॉटेल्स व लॉजमध्ये “आंबटशौकीन कपल्सच्या” वाढत्या वर्दळीबाबत शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तींकडून या ठिकाणी ओळखपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाते का, तसेच सर्व नियमांचे पालन होते का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरात आंबटशौकीन युवकांकरिता धूम्मं मचविणारे तीन अड्डे घातक ठरत असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त होत आहे . “Mha**Rजा”,कै**Loss , व रॉय****Paja हे तिन अड्डे “आंबटशौकीन कपल्स “साठी सर्वस्व चर्चेचा विषय ठरत आहे . हे अड्डे खूप जोमात चालत तरी कसे ? याकडे नागरिक, पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची आता गरज आहे.कारण यात येणारे आपल्याच “कुणीतरी ” असू शकतात किंवा काहीं आंबटशौकीन अल्पवयीनांना फूस लावून आणल्या जात असावे असाही अंदाज व्यक्त केल्या जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या “भाडखाणाऱ्या” अड्ड्यांकडे कुणीतरी लक्ष देणार का ? की झोपेचे सोंग घेत असलेले नामधारी संघटना या ‘ आंबटशौकीनांचा’ अड्ड्यांकडे लक्ष देऊन आहारी जाणाऱ्या युवापिढीला सतर्क करणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.यात सध्या चिखलगावातील “एक भाडखाणारा अड्डा” सध्या जास्तच trend वर असल्याची माहिती समोर येत आहे .
“भाडखाऊ” अड्ड्यांमध्ये बनावट कागदपत्राच्या ……..
या “भाडखाऊ” अड्ड्यांमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारावर “आंबटशौकीन कपल्स “ला काहीही न विचारता रूम्स उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. यावर “पांढरपोशी नेते आणि युवकांनी एकत्र येऊन शहरातील अश्या “भाडखाणाऱ्या” अड्ड्यावर बारकाईने लक्ष देऊन सापळा रचून यांचे मनसुबे उध्वस्त केले पाहिजे.
वणी शहरात सुरू असलेल्या हॉटेल लॉजचा चर्चेमुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. कायद्याचे पालन होत आहे का, हॉटेल चालक सर्व आवश्यक नोंदी ठेवतात का आणि नियमांचे काटेकोर पालन होते का, याची खात्री करण्यासाठी पोलीस विभाग,स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

