Wednesday, April 15, 2026
HomeBreaking Newsवणीतील "Couple स्पेशलचे" ते चार "लॉज"चर्चेत......

वणीतील “Couple स्पेशलचे” ते चार “लॉज”चर्चेत……

Ajay Kandewar,Wani:- वणी शहरात सध्या “ते चार”  लॉज अक्षरशः चर्चेचा विषय ठरत आहेत. वणी चिखलगाव रस्त्यालगतच्या शोरूमजवळ, पवित्र स्थळाच्या शेजारी, मोबाईल दुकानांचा चौकातील आणि वन परिसरालगत असलेली ही ठिकाणे “कपल स्पेशल” म्हणून ओळखली जाऊ लागल्याची चर्चा जोर धरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी ये-जा, संशयास्पद हालचाली आणि बंद दरवाज्यांआड सुरू असलेल्या “त्या व्यवहारांमुळे” नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “हे फक्त हॉटेल-लॉज आहेत की काही वेगळंच चालतंय?” असा थेट सवाल आता रस्त्यावरूनही ऐकू येऊ लागला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये एवढी चर्चा असताना सामाजिक व राजकीय संघटना मात्र ‘कानाडोळा’ करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि अगदी पवित्र स्थळाजवळही असे प्रकार सुरू असल्याची चर्चा असताना संबंधित विभाग, वणीतील सामाजिक संघटना, राजकीय संघटना झोपेचे सोंघ घेत असल्याने अनेक प्रश्न निर्माण करते. हॉटेल चालकांची बेधडकपणा वाढत चालल्याचे बोलले जात असून, “नियम आहेत की फक्त कागदावर?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, या चार ठिकाणांपैकी एका लॉजमागे “पांढरपोशी” सूत्रधार असल्याची कुजबुज शहरात वेगाने पसरत आहे. जर यात तथ्य असेल, तर हा केवळ नियमभंग नसून संपूर्ण व्यवस्थेलाच आव्हान देणारा प्रकार ठरू शकतो. आता वेळ आली आहे ती केवळ चर्चेची नाही, तर ठोस कारवाईची आणि यावर करडी नजर असण्याची आहे.वणीकरांनी जागे होऊन प्रश्न विचारणे गरजेचे आहे, आणि प्रशासनानेही ‘झोपेचे सोंग’ सोडून सत्य समोर आणणे अत्यावश्यक झाले आहे. कारण आपल्याच घरची उद्या पिढी हे बरबाद होण्याच्या मार्गावर लागलेली आहे.

वणी ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हा यात संबंधित युवक हा 7 ते 8 वेळा लॉजवर गेला. मात्र आता तो युवक लग्नास स्पष्ट नकार देत आहे. या घटनेमुळे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि “हॉटेल्सची बेफिकिरी”या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत.प्रश्न असा उभा राहतो की,हॉटेल आणि लॉज चालक नेमके कोणते नियम पाळत आहेत? बेधडक पै*****देऊन राजरोसपणे हा गैर कृत्याचा धंदा जोमात फोफावला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page