वणी, दि. ३ :- वणी लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी येथे लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या पालकांसाठी खास कार्यशाळा – Soft Parenting (सौम्य पालकत्व)’ या विषयावर दि.३ ऑक्टोबर रोजी डॉ दिपक घरझोडे* यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष तुषार नगरवाला उपस्थित होते.
सुरुवातीला अध्यक्षा संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त करून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. आजच्या वेगवान काळात मुलांचे संगोपन ही पालकांसाठी एक मोठी जबाबदारी असून, मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रेमळ व सकारात्मक संवाद कसा असावा याबाबत मार्गदर्शन करणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिपक घरझोडे यांनी सव्वा तास पालकांशी संवाद साधला. त्यांनी सौम्य पालकत्व, मुलांचे मानसशास्त्र, मोबाईलचा अतिवापर, हट्टीपणा, अभ्यासातील गोडी निर्माण करणे, पालक-मुलातील सुसंवाद यावर अत्यंत सोप्या भाषेत व उदाहरणांसह मार्गदर्शन केले. ‘आपल्या एका तासाने आपल्या मुलाचे आयुष्य बदलू शकते!’ हा त्यांचा संदेश पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यशाळेनंतर लायन्स ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर व क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला व खुशी नगरवाला* यांचे हस्ते डॉ. दिपक घरझोडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेला नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या पालकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पालकांनी प्रश्नोत्तरे सत्रात सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमाचे सुरेख संचालन किरण बुजोणेयांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिता खुसपुरे यांनी केले.यावेळी अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

