Monday, October 5, 2026
HomeUncategorizedमाणुसकीच्या नात्याने प्रत्येकाच्या सोबत उभा राहणारा मोहदा माजी उपसरपंच सचिन भाऊ रासेकर

माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाच्या सोबत उभा राहणारा मोहदा माजी उपसरपंच सचिन भाऊ रासेकर

Wani:- वणी तालुक्यातील मोहदा गावात प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध, हसतमुख स्वभाव आणि आपुलकीची वागणूक ही सचिन भाऊंची वेगळी ओळख आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीच्या सुख-दुःखात धावून जाणे, अडचणीच्या काळात आधार देणे आणि गरजूंना शक्य ती मदत करणे, ही भूमिका त्यांनी केवळ बोलण्यातून नव्हे तर आपल्या कृतीतून जपली आहे. निराधारांचा आधार आणि सर्वसामान्यांचा विश्वास हीच त्यांच्या सामाजिक वाटचालीची खरी कमाई आहे.

राजकारणाच्या गोंगाटापेक्षा समाजकारणातून आपली प्रतिमा उंचावणे, हेच त्यांचे ध्येय राहिले आहे. कितीही विरोध झाला, कितीही बोंबाबोंब झाली, तरी त्याला शब्दांनी प्रत्युत्तर देण्याऐवजी शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. “कामाचं उत्तर कामातूनच” हा जणू त्यांच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्या जवळ असते; मात्र ते उत्तर चर्चेत किंवा आरोप-प्रत्यारोपात नसून प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून देण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

मोहदा गावाच्या विकासासाठी आणि गावाचा कायापालट घडवून आणण्याच्या ध्येयाने ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. पद असो वा नसो, प्रसिद्धी मिळो वा न मिळो, समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती कायम ठेवणे, हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सचिन भाऊंची ओळख केवळ उपसरपंच म्हणून नव्हे, तर माणसांशी नातं जोडणारा, शांतपणे काम करणारा आणि आपल्या कृतीतून उत्तर देणारा हसतमुख चेहरा म्हणून निर्माण झाली आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढीच सदिच्छा—मोहद्याच्या विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, समाजकारणाची ही वाटचाल अखंड सुरू राहो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू व माणुसकीची ऊब सदैव अशीच कायम राहो.सचिन भाऊ उपसरपंच यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

“गोंगाट नको… आरोप नको…फक्त काम, समाजकारण आणि विकासातून उत्तर ..हीच सचिन भावांची कार्यपद्धती!”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page