Saturday, August 29, 2026
HomeBreaking Newsमानकीत फिल्डिंग लावून रेपिस्ट "राजू पोटे " याला अटक......!

मानकीत फिल्डिंग लावून रेपिस्ट “राजू पोटे ” याला अटक……!

वणी पोलीसांना यश.

Ajay Kandewar,Wani:- शहरातील वीट भट्ट्याजवळ अतिप्रसंग व अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या वणी पोलिसांनी मानकी शिवारातून “राजू पोटे ” याला (दि.८ ) रोजी अटक केले.

राजू पोटे उर्फ कटर (रा.खरबडा) असे या अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. अखेर 7 दिवसांत आरोपी गजाआड करण्यात वणी पोलिसांना यश आले. गांधीनगर येथील वीट भट्ट्याजवळ विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या युवतीवर मागून येऊन आरोपीने तिला बळजबरीने झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता.ही घटना वणी शहरात वाऱ्यासारखी पसरली. वणी पोलिसांनी चक्रे फिरवित कामाची गती वाढविली मिळालेल्या माहितीवरून त्या संशयीताचा कसून शोध सूरू केला.अखेर तो मानकी शिवारात लपून असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. सायं.4 वाजता पोलिसांचा मानकी शिवारात चोर.. पोलिसांचा खेळ सूरू झाला असता, तिथे राजू पोटे आढळला व पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता तो पोलिसांचा तावळीतून पळून जाण्याचा स्थितीत असताना त्याचा मुसक्या वणी पोलीसांनी आवळल्या .

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप,SDPO गणेश किंद्रे व वणी ठाणेदार PI गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख API धीरज गुल्हाने, डीबी पथक व वणी पोलीस यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page