Ajay Kandewar, Wani :-वणी शहरातील राजकारणात सुरू असलेल्या तर्क–वितर्कांना भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले असले, तरी त्या उत्तरानंतरच नव्या प्रश्नांची मालिकाच उभी राहिली आहे. प्रभाग क्रमांक नऊमधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक टापू उर्फ हाफिज शेख यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा रंगात असतानाच, भाजपाचे नेतृत्व करणारे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी एका व्हिडिओद्वारे ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत, “भाजपाला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही” असे ठाम विधान केले.मात्र, याच विधानावरून आता शहरात नवीन आणि तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
जर कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, तर मग जनतेची गरज आहे का?की भाजपासाठी मतदानाच्या दिवशी फक्त EVM पुरेसे आहेत?असा सवाल आता नागरिकांतून ऐकू येत आहे.ही चर्चा कोणत्याही आरोपावर आधारित नसली, तरी लोकशाही व्यवस्थेतील जनतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे.लोकप्रतिनिधी जनतेतून निवडले जातात की यंत्रणेतून—हा सवाल आता चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.भाजपाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असली, तरी त्या भूमिकेचा अर्थ जनतेपर्यंत कसा पोहोचतो, यावरच राजकीय विश्वास अवलंबून असतो.आज वणीत भाजपाच्या विधानावरून सुरू झालेली ही चर्चा उद्या राजकीय वादळाचे रूप घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
•भाजपाला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही म्हणणे कितपत योग्य…..
भाजपाला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही म्हणणे कितपत योग्य उदगार आहे. यावरून असं होणार की काय की जे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत नगरसेवक निवडून आलेले आहेत हे मग पक्षाचे काम करतील की पक्षाच्या लोकांचे काम करतील हे जनतेचे आहेत की पक्षाचे आहेत हे तरी सांगावे. मग आता हाही प्रश्न पडते की अन्य पक्षाचे जर त्यांच्याकडे जर जात असेल आणि काही गोष्टी चर्चा करत असेल मग त्यावेळी असं म्हणणे योग्य आहे का तुमची आता मला गरज नाही तुम्ही इथं का आले असं म्हणणं खरंच कितपत योग्य आहे या गोष्टीची चर्चा पूर्ण शहरभर पसरलेली आहे यावरून भाजपने उत्तर देणे सुद्धा गरजेचे आहे आता.

