Ajay Kandewar,Wani:- येथील प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनिल बिलोरिया तर सचिवपदी सागर बोढे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी निवडीसाठी वणी येथील नगर वाचनालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.निवडीनुसार उपाध्यक्षपदी रमेश तांबे, सहसचिवपदी जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्षपदी तुषार अतकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून गजानन कासावार, विनोद ताजने, रवी बेलूरकर, डॉ. किशोर चवणे,मंगल तेलंग व असिफ शेख यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक नवले यांनी पाहिले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, पत्रकारांच्या कल्याणासाठी संघटनेमार्फत सकारात्मक व विधायक कार्य केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

