Thursday, July 30, 2026
HomeBreakingपठारपूर मार्गावरील पूल पाण्याखाली.....

पठारपूर मार्गावरील पूल पाण्याखाली…..

Ajay,Wani :- तालुक्यातील कायर गावाजवळील विदर्भा नदी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असून पठारपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांनी या रस्त्याचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पूराचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूल किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर पाहण्यासाठी नदीकाठावर किंवा पुलावर गर्दी करू नये तसेच लहान मुलांना नदीच्या परिसरात जाऊ देऊ नये. स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page