Sunday, October 25, 2026
HomeBreaking News"ती " नियुक्ती पुर्णपणे बेकायदेशीर आणि संदिग्ध.......!

“ती ” नियुक्ती पुर्णपणे बेकायदेशीर आणि संदिग्ध…….!

• सलोनी तेलतुंबडे हिचीच नियुक्ती करा. •वांजरी गावातील एक "कलंकित" करणारा प्रकार.वाचाच...!

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील वांजरी गावातील जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव :जोत्स्ना विकास मोडक यांनी शासकीय अधिका-यासमोर चूकीची माहिती देवुन बेकायदेशीरपणे नोकरी प्राप्त केलेली आहे त्यामुळे अशा व्यक्तीला आता अंगणवाडीका सेविका म्हणुन नियुक्ती न देता सलोनी तेलतुंबडे यांना नियुक्ती देण्यात यावी, याकरीता यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

सविस्तर……

बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वणी यांनी मौजा वांजरी येथील अंगणवाडी सेविका पदाकरीता आलेल्या सर्व उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी मार्च २०२५ मध्ये प्रसिध्द केली.त्यावर समिती प्रमुख, समिती सहाय्यक, पर्यवेक्षिका, कर्मचारी तथा स्वतः बालविकास प्रकल्प अधिकारी या सर्वाच्या सह्या आहे. त्या यादीनुसार एकुण १८ उमेदवारामध्ये जोत्स्ना ताजणे (लग्नानंतरचे नावः जोत्स्ना रविंकांत बोधाने) हिला जास्त गुण असल्यामुळे तिला वांजरी येथील अंगणवाडी सेविका म्हणुन दिनांक २५/०४/२०२५ रोजी नियुक्ती देण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव जोत्स्ना ताजणे (लग्नानंतरचे नावः जोत्स्ना रविंकांत बोधाने) यांची नियुक्ती दि. ३०/०४/२०२५ रोजी रद्द करण्यात आलेली आहे.बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांनी मार्च २०२५ मध्ये प्रसिध्द केलेल्या जोत्स्ना ताजणे (लग्नानंतरचे नावः जोत्स्ना रविंकांत बोधाने) आणि कु. जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव: जोत्स्ना विकास मोडक) या दोघींना समान ६७ गुण आहे.कु.सलोनी बाळु तेलतुंमडे हिला बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांनी दि. २९/०१/२०२४ रोजी जा.कं. एबाविसेयो/आस्था / वशी/२०/२०२४ अंतर्गत मौजा वांजरी येथील अंगणवाडीका मदतनिस म्हणुन नियुक्ती दिलेली आहे जेव्हा की, प्रसिध्द यादीनुसार कु. सलोनी बाळु तेलतुंमडे हिला सर्वात जास्त ६० गुण होते .त्या खालोखाल इतरांना होते. त्या यादीनुसार कु. जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव जोत्स्ना विकास मोडक) हिला ५९ गुण होते. त्यामुळे गुणवत्ता यादीनुसार निवेदन देणार म्हणजे कु. सलोनी बाळु तेलतुंमडे हिची मौजा वांजरी येथील अंगणवाडी मदतनिस म्हणुन नियुक्ती होणे न्यायोचित व गरजेचे होते. परंतु बालविकास प्रकल्प अधिकारी ( एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, वणी ) यांनी हिची गुणवत्ता डावलून त्या जागेवर जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव : जोत्स्ना विकास मोडक) हिची नियुक्ती केली. जी बाब पुर्णपणे बेकायदेशीर आहे व संदिग्ध आहे. महत्वाचे म्हणजे प्रसिध्द झालेल्या गुणवत्ता यादीवर श्रीमती जोत्स्ना विकास मोडक हिने दिनांक ११/०८/२०२३ रोजी आक्षेप दाखल करून तिने त्या तारखेस MS-CIT ची गुणवत्ता धारण केली आहे . त्यामुळे त्याचे दोन गुणाची मोजदाद करण्यात यावी, असा आक्षेप दाखल केला होता. परंतु बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वणी यांनी आक्षेप खारीज केला होता. त्यामुळे जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव: जोत्स्ना विकास मोडक) हिची नियुक्ती पुर्णपणे बेकायदेशीर आहे व संदिग्ध आहे.

महत्वाचे म्हणजे लेखी आक्षेप दाखल करणार हिला मिळालेल्या माहितीनुसार दि. ११/०८/२०२३ रोजी जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव जोत्स्ना विकास मोडक) हिचेजवळ कुठलीही MS-CIT ची अर्हता नव्हती. तिला ती अर्हता मे २०२४ मध्ये प्राप्त झाली .त्यामुळे तिने दि.११/०८/२०२३ रोजी शासकीय अधिका-यासमोर चूकीचे प्रतिनीधित्व करून चूकीची माहिती दिली . ही बाब गंभीर व गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्य करणा-या व्यक्तीला तिचे गुण कमी असतांनाही गुणवत्ता डावलुन नियुक्ती देणे चूकीचे आहे.

आताही अंगणवाडीका सेविका या पदाकरीता जोत्स्ना बंडु देवतळे (लग्नानंतरचे नाव: जोत्स्ना विकास मोडक) हि राजकीय दबाव वापरून निवेदकाला समान गुण असतांनाही तिला डावलुन स्वतःची नियुक्ती करून घेण्याचे बेतात आहे जेव्हा की, तिने याअगोदरच शासकीय अधिका-यासमोर चूकीची माहिती देवुन बेकायदेशीरपणे नोकरी प्राप्त केलेली आहे त्यामुळे अशा व्यक्तीला आता अंगणवाडीका सेविका म्हणुन नियुक्ती न देता सलोनी तेलतुंबडे हिची नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे .

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page