Sunday, November 15, 2026
HomeBreakingडेंजर Accident.....समोरासमोर दुचाकी-ट्रकची धडक अन् दोघेही रक्तबंबाळ........

डेंजर Accident…..समोरासमोर दुचाकी-ट्रकची धडक अन् दोघेही रक्तबंबाळ……..

Ajay Kandewar,Wani :- पाटण येथून मुकुटबनच्या दिशेने दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोघांवर काळाने घाला घातला. मांगली शेतशिवाराजवळ दुचाकी आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव पंडित भोयर (वय ६०, रा. येडशी) असल्याची माहिती असून, वणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH-34 AT-2561 क्रमांकाच्या दुचाकीवरून पंडित भोयर आणि बापूराव पवार (वय ६०, रा. येडशी) हे दोघे पाटण येथून मुकुटबनच्या दिशेने जात होते. दरम्यान, MH-16 CA-0536 क्रमांकाचा मालवाहू ट्रक पाटणच्या दिशेने जात असताना मांगली शेतशिवाराजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.अपघातात बापूराव पवार यांच्या पायाला अत्यंत गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा पाय पूर्णतः तुटल्याची माहिती आहे. त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

विशेष म्हणजे, बापूराव पवार यांचे जावई पाटण येथे वास्तव्यास असल्याने दोघेही जेवणासाठी पाटण येथे गेले होते. तेथून जेवण करून येडशीकडे परतत असताना मांगली शेतशिवाराजवळ हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पंडित भोयर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे येडशी गावावर शोककळा पसरली असून, अपघाताबाबत पोलीस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page