Sunday, June 14, 2026
HomeBreakingघुग्गुसचा 'शाहरुख उर्फ पावड्या' "ठाणेदार मनवर" चा हातात......

घुग्गुसचा ‘शाहरुख उर्फ पावड्या’ “ठाणेदार मनवर” चा हातात……

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

शाहरुख गुलजार खान ( 31) रा.घुघुस हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ठाणेदार एपीआय संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंगोली येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.या कारवाईत आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण अंदाजे 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईचे खरंच कौतुक होत आहे. यापूर्वीही अवैध धंदे व गुन्हेगारांविरोधात शिरपूर ठाणेदार संतोष मनवर व पोलीस पथकानी MD ड्रग्स ची मोठी करत अनेक गुन्ह्याचा छडा लावला, मारेगाव येथील क्लिष्टगुन्ह्याचा तपास अवघ्या काही तासात लावले त्यातच गावठी पिस्टलसारखे शस्त्र मिळवणे आणि आरोपीला जेरबंद करणे हे ठाणेदार संतोष मनवर व पथकाचा तत्परतेचे उदाहरण मानली जात आहे. म्हणजेच गुन्हा कितीही क्लिष्ट असो, आरोपी कितीही चलाख असो; API संतोष मनवर यांच्या तपासाच्या जाळ्यातून सुटका कठीणच.

सदरची कारवाई ही यवतमाळचे SP कुमार चिंता, ASP थोरात, वणी SDPO सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार संतोष मनवर,PSI धीरज गुल्हाने,सुनिल दुबे,अविनाश बानकर,इकबाल शेख,पंकज कुडमेथे ,दिपक वाकडे,किरण दासरवार,प्रफुल नाईक यांनी पार पाडली.

API संतोष मनवर हे नाव म्हणजे गुन्हेगारिचा छडा….

API संतोष मनवर हे नाव म्हणजे गुन्हेगारी जगतातील कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानले जाते कारण क्लिष्ट गुन्ह्यांची उकल,आरोपींचा अचूक मागोवा आणि कायद्यावरील निष्ठा,यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या कामगिरीमुळे अनेक गुन्हेगारांना कायद्याचा धाक जाणवत असल्याने वणी तालुक्यात शिरपूर पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page