Friday, July 24, 2026
HomeBreakingकेंद्र सरकारविरोधात वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन....

केंद्र सरकारविरोधात वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन….

Ajay,Wani:- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तसेच दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुक केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. वणी येथील छ.शिवाजी महाराज यांच्या पूर्णांकित पुतळ्यासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनांतर्गत कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता ‘धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो’, ‘विद्यार्थीयोंको न्याय दो’ आदी घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

वणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात जंतर-मंतर येथील लाठीचार्जची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी .भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच NEET पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

यावेळी या आंदोलनात प्रदेश सचिव संजय खाडे,विकेश पानघाटे, जय आबड ,प्रमोद वासेकर, डॉ. कावडे, मोरेश्वर पावडे, रुपेश ठाकरे, टिकाराम कोंगरे, वंदना आवारी, रवींद्र होकम, सुधीर खंडाळकर, मोरेश्वर वासेकर, फरीद शेख, राजू अंकतवार, सुरज पुल्लेवार, तेजराज बोढे, राजू काळे, भास्कर वासेकर, अनंत डुंबारे, पांडुरंग पंडिले, डॉ. महेंद्र लोढा, अफसर शेख,जयसिंग गोहोकार, रवींद्र कांबळे, श्यामा तोटावार, मनीष खाडे, अशोक चिकटे, पलाश बोढे, रोहित मालेकर, वंदना धगडी, सविता रासेकर, प्रेम मेश्राम, प्रेम मंगाम, अनिल भोयर, विजय मालेकर, अशोक नागभीडकर, भास्कर आत्राम, नंदकिशोर अंबोरे, पुंडलिक गुंजेकर, सुरेखा वडीचार, अल्का मोवाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page