Ajay Kandewar,Wani:-राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर ता. 14 में 2026 रोजी सायंकाळी 8.30 समोर आला असून, आता रात्रीच्या वेळीसुद्धा स्पॉट पाहणीमध्ये PHC मध्ये एकही डॉक्टर, नर्स अथवा कर्मचारी मुख्यालयात उपस्थित नसल्याचे खरे वास्तव पुराव्यानिशी उघड झाले आहे. अश्याच एक आठवड्या आधी म्हणजेच 8 मे 2026 रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने २ तास रुग्णांची हेळसांड झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. त्यावेळी या प्रकारनाचा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने “त्या दोन मुजोर डॉक्टरांचा माज” किती वाढला आहे, हे पुन्हा स्पष्ट झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.
यावेळी गावातील पत्रकार अजय कंडेवार यांनी थेट रात्रीच्या वेळी PHC गाठून जिओ-टॅग व्हिडिओ आणि छायाचित्रे घेतली. त्यामध्ये मुख्यालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रात्री ड्युटीवर असणे अपेक्षित असताना कर्मचारी गायब होते. केवळ एक नर्स उपस्थित असल्याचे आढळले, मात्र तिची ड्युटी जनरल असल्याचे तिने स्वतः व्हिडिओमध्ये सांगितले. हा प्रकार उघड होताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही फोनद्वारे माहिती देण्यात आली. लोकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, एवढा गंभीर प्रकार समोर येत असतानाही गावातील पुढारी आणि लोकप्रतिनिधी मात्र “गाढ झोपेत” असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. निवडणुकीच्या काळात गावासाठी मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आता आरोग्याच्या प्रश्नावर पूर्णपणे शांत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या दोन मुजोर डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी आता जोर धरू लागली असून, येत्या काळात आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.

गावातील पांढरपोशी आता आरोग्याच्या प्रश्नावर पूर्णपणे शांत …..?
“निवडणूक आली की गावातील काही पुढारी बेडकासारखे बाहेर पडतात; मात्र राजूरच्या आरोग्याच्या ज्वलंत प्रश्नावर सर्वच पांढरपोशी नेते गप्प का? रात्री डॉक्टर अनुपस्थित, कर्मचारी मुख्यालयात नाहीत, तरीही कोणीच आवाज उठवत नाही… यामुळे ‘त्या दोन डॉक्टरांना’ काही पांढरपोषांचा वरदहस्त तर नाही ना? अशी चर्चा आता गावात उघडपणे रंगू लागली आहे. मग तो हरामखोर पांढरपोशी कोण ? जो लोकांचा आरोग्याशी खेळ करणाऱ्यांसोबत राहून स्वतःची पोळी शेकणारा?

बघा… रात्री 8.35 मि. चक्क…. राजूर PHC ला लॉक लावण्यात आले. किती किळसवाणा प्रकार आहे हा….

