Saturday, August 29, 2026
HomeBreakingअधिवेशनात गाजवला “मटका” पण साहेब "चटका" कुणाला...

अधिवेशनात गाजवला “मटका” पण साहेब “चटका” कुणाला…

Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभा आमदार संजय देरकर यांनी अधिवेशनात वणी शहराचा “मटका” जुगाराचा मुद्दा जोरदारपणे गाजवत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी मटका जुगाराचे तीन गंभीर ठिकाणांचा उल्लेख मांडत हा प्रकार केवळ अवैध धंदा नसून कुटुंब उद्ध्वस्त करणारा, तरुणाईला भरकटवणारा आणि समाजाला पोखरणारा विळखा असल्याचे ठणकावले. अधिवेशनात हा मुद्दा एवढ्या ताकदीने दणाणूनही, वणीसह परिसरात मटका जुगाराची चर्चा उघडपणे होत असताना तो नेमका कोणाच्या आशीर्वादाने फोफावतो आहे, हा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे.

सर्वात मोठी बाब म्हणजे, सभागृहात मटका गाजला, पण स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासनाची भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सामान्य नागरिकांना मटका कुठे चालतो, कोण फिरते, कोण पैसे गोळा करतो, याची चर्चा माहिती असते; मग पोलीस यंत्रणेला काहीच कसे दिसत नाही, असा जळजळीत प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. वरवरची कारवाई, दिखाऊ धाडी आणि काही दिवसांनी पुन्हा तोच धंदा सुरू, या प्रकारामुळे कारवाईपेक्षा संगनमताचीच कुजबुज अधिक जोर धरू लागली आहे.

आता अधिवेशनात आवाज उठला असल्याने हा विषय केवळ स्थानिक राहिलेला नाही, तर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेची थेट परीक्षा बनला आहे. मटका अड्डे उद्ध्वस्त करणे, मुख्य सूत्रधारांवर कारवाई करणे आणि या जुगाराला अभय देणाऱ्यांवरही हात घालणे, हीच खरी अपेक्षा जनतेची आहे. अन्यथा उद्या जनतेच्या तोंडी एकच वाक्य राहील “अधिवेशनात मटका जोरात वाजला, पण पोलीस प्रशासन नेहमीप्रमाणेच गप्प बसले.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page