Wednesday, June 3, 2026
HomeBreakingअखेर वणीला "Gajni" नाही तर "खमक्या ठाणेदार" मिळाला.

अखेर वणीला “Gajni” नाही तर “खमक्या ठाणेदार” मिळाला.

Ajay Kandewar,Wani:- वणी पोलिस ठाण्याच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, वणीचा चप्पा-चप्पा परिचित असलेला, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा आणि आपल्या अभ्यासू व मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखला जाणारा अधिकारी आता ठाणेदारपदाची धुरा हाती घेतली. विशेष म्हणजे हा अधिकारी वणीसाठी नवीन नसून, यापूर्वीच्या सेवाकाळात त्याने नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना आणि पोलिस यांच्यात विश्वासाचे मजबूत नाते निर्माण केले होते.

वणीची सामाजिक, राजकीय आणि कायदा-सुव्यवस्थेची नाडी अचूक ओळखणाऱ्या या अधिकाऱ्याच्या आगमनाने पोलिस प्रशासनाला नवी धार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनुभव, शिस्त, समन्वय आणि जनसंपर्क यांचा उत्तम मेळ असलेल्या या “खमक्या ठाणेदाराकडून” वणीकरांच्या अपेक्षा वाढल्या असून, शहराच्या सुरक्षेला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेला नवा रुबाब मिळणार आहे. गणित गोपाल उंबरकर यांची बदली झाल्यानंतर नवीन ठाणेदार चे स्वागत करताना वणी पोलीस कर्मचारी आणि त्यांचे हास्य हेच सांगत जाते की ,आता आम्हाला आता “गजनी” नाही “खमक्या “ठाणेदार मिळाला अस त्या चित्रावरून दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page