अजय कंडेवार,Wani :- वणी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये भेट देवून नागरिकांशी डोअर टू डोअर अडीअडचणी,समस्या जाणुन घेत त्यांच्याशी प्रचारसंवाद साधण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार संजय नि.देरकर यांनी दि.9 शनिवार रोजी मुर्धोनी, पळसोनी, झरपट, सोमनाळा,निंबाळा ,राजूर कॉ ,राजूर इजारा ,बोदाड ,सोनापूर भांडेवाडा येथे गावदौरा केला आहे. त्यांनी अलीकडे मतदारसंघांतील बहुतांश गावे पिंजून काढत शिवसैनिकांना जोडत ऐन विधानसभा निवडणूकीचा प्रचारातही जोरदार आघाडी घेतली. या भेटीगाठी आणि दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन जनाधार त्यांच्या सोबत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शनिवार रोजी मुर्धोनी येथून शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. संजय देरकर यांनी अंबामाता देवस्थानाला भेट देत दर्शन घेतले. गावातील श्रीराम मंदिर व मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले. संजय देरकर गावात पोहोचताच गावक-यांनी वाजत गाजत त्यांचे स्वागत केले.मुर्धोनी, पळसोनी, झरपट, सोमनाळा,निंबाळा ,राजूर कॉ ,राजूर इजारा ,बोदाड ,सोनापूर भांडेवाडा गावात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले. गावातील नागरिकांनी “#बटेंगे नही_जितेंगे” चा नारा दिला.प्रत्येक गावातील भगिणींनी संजय देरकर यांचे हार टाकून स्वागत केले.
या पदयात्रेत राजीव कासावार, सुनील कातकडे, संजय निखाडे,अजय धोबे,असलम खान, डेव्हिड पेरकावार, डॅनी संड्रावार, सरपंचा विद्या पेरकारवार, घनश्याम पावडे,दिलिप परचाके, कुमार मोहरपुरी यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.