Ajay Kandewar,Wani:- संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांची संभाजी ब्रिगेड मधून अधिकृतरित्या पत्र काढून हकालपट्टी करण्यात आली होती त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीनंतर वणी तालुका अध्यक्ष गणेश बोंडे यांना पदमुक्त (आता..गणेश बोंडे तालुकाध्यक्ष नाही) असे स्पष्ट सूचक विधान संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर दिले.
गेल्या ३० वर्षापासून मराठा सेवा संघाचा एक पक्ष संभाजी ब्रिगेड सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात प्रचंड आक्रमकपणे कार्य करत आलेली आहे. नंतरच्या काळात २०१६ ला संभाजी ब्रिगेडने अधिकृत राजकीय भूमिका घेवून पक्षाची ध्येय धोरणे व संहिता ठरली व अडीच वर्षापासुन संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांना जाहिररित्या पाठिंबा देत सोबत राहत होते.परंतु ऐन विधानसभा निवडणुकीत जागावाटपवरून गोंधळ निर्माण झाला आणि उद्धव ठाकरे गटाने मित्र पक्ष संभाजी ब्रिगेड यांना एकही जागा वाटप केलें नाही आणि ते उबाठा या पक्षातून बाहेर आलें व स्वबळावर विधानसभा निवडणुकां लढण्याचा निर्णय घेतला त्यात वणी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून “अजय धोबे “यांनी ए.बी फार्म देखील आणला व नामांकन फॉर्म पक्षाच्या नावावर भरले देखील असे वरिष्ठांचे म्हणणे आहे तसेच परंतु नामांकन मागें घेण्याचा दिवशी त्यांनी पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता नामांकन मागें घेतले . त्याव्यक्तीरिक्त एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत अजय धोबे, वणी तालुक्याची कार्यकारिणीतील तालुका अध्यक्ष गणेश बोंडे व काही कार्यकर्ते यांनी पक्ष परस्पर पत्र काढून जाहीर पाठिंबा दर्शविला होता .ही बाब वरिष्ठांना कळताच पक्ष संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांची संभाजी ब्रिगेड मधून हकालपट्टी करण्यात आली होती .आता..गणेश बोंडे तालुकाध्यक्ष राहणार नाही असे स्पष्ट सूचक विधान संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी दिले आहे. येत्या पुढील महिन्यात वणी तालुक्याची नवीन कार्यकारीणी गठीत करण्याठी संपर्क प्रमूख तालुक्यांत येणार आहेत पुढील बाबींची चर्चा देखिल येथील काहीं अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी करणार आहे. अशीही माहिती प्रतिनिधीला देण्यात आली आणि नवीन काहीं नियुक्त्या देखिल होणार आहे अशी माहिती प्रतिनिधीला संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी दिले.