अजय कंडेवार,Wani:- प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रांत केली. स्त्रीची सुरक्षितता हा जरी नाजूक मुद्दा असला तरी आत्मविश्वासाने आज ती व्यक्त होत आहे. असेच काही एक चित्र प्रचार माध्यमातुन दिसल आहे.ते म्हणजे किरण ताईं देरकर.…..
किरणताईं या सन्मान स्त्री शक्तीचा जागर या फाऊंडेशनचा अध्यक्ष आहे. त्यांनी मागील अनेक वर्षापासुन स्त्री समस्या सोडविण्यासाठी गावं, पोड, वस्ती ,शहर असा एकूणच वणी मतदारसंघच पिंजून काढला आहे.त्यांनी ठिकाणीं स्वतः भेट देत स्त्रीयांना आपल्या सोबत घेत त्यांना आधार दिला.तोच आधार आज “ताई “व “भाऊंना”तारणार यात तीळमात्र शंका नाहीच. कारण ताईंचा स्वभाव व भाऊंचा स्वभाव हा अत्यंत मृदू व जिवाभावांचा वाटत. म्हणून लोकांची जोड आणि साथ त्यांना या विधानसभा निवडणूकीत कामीं येईलच यात नो कॉमंट्स आहे.त्यांनी काल दिनांक 7 नोव्हेबर रोजी वणी मतदार संघातील “चिखली व येनक”येथील माँ जगदंबा मातेचे दर्शन घेत किरण देरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि तो झंजावात प्रचार बघता महिलांची लक्षणीय उपस्थिती होती