Ajay Kandewar,Wani:- विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. वणी विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस लागली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात वणीतील सद्य राजकीय परिस्थितीचा एक रंजक आराखडा मांडण्यात आला आहे. या अहवालात संजय देरकर यांची वैयक्तिक लोकप्रियता वाढली असली तरी सध्याच्या सरकारबाबत जनतेमध्ये काही प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
MVA संजय देरकर यांनी लोकप्रियतेत अनेकांना मागे टाकल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, विधानसभेतील ५१ टक्के जनता महायुतीचा सरकारच्या कारभारावर नाराज असून त्यांना सत्ताबदल हवा आहे, तर ४१ टक्के लोक सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे मानत आहेत. म्हणजेच वणी विधानसभेतून “संजय देरकर”यांचाचा डंका दिसत आहे.