Ajay Kandewar,वणी:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीचा जोर सूरू झाला असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचे गावोगावी दौरा करून प्रचार सुरु आहे. देरकर यानी मंगळवार 15 नोव्हे.रोजी मारेगाव तालुक्यातील प्रचार दौरा अरुणा ताई खंडाळकर, वसंतराव आसुटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.यात सकाळी गौराळा- वरुड- आकापूर- लाखापूर- वनोजा- देवी — कानोडा – शिवणी (धोबे)-पार्डी – चोपण – मार्डी – चिंचमंडळ- कोथुराबोरी – गदाजी -कुंभा परमडोह -गोगुलधरा – खैरगाव- वाघधरा- वसंतनगर- सराटी -खंदणी -भुरकी (पोड) – राहेपट या गावांचा दौरा करुन मतदारांशी संपर्क साधला.अनेक गावा मध्ये नागरिकांनी संजय देरकर यांचे जंगी स्वागत, सत्कार, फटाके फोडून व अक्षवंत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. असंख्य नागरिकांसह प्रचाराने संजय देरकर यांच्या कडे चांगलेच लक्ष वेधले जात आहे.भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहो असे म्हणून प्रचारात सामील झाले.
यावेळी अरुणाताई खंडाळकर,वसंत राव आसूटकर, मारोती गौरकार, सरपंच अरविंदभाऊ ठाकरे,सुनील कातकडे, संजय निखाडे ,गजानन खापणे,डीमंनताई टोंगे ,विजय धानोरकर ,अशोक धोबे ,अरुण नक्षणे, नानाभाऊ डाखरे, पांडुरंग लोहे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.