•बदलत्या जीवनशैलीत वृक्षांच्या संरक्षणाची व वृक्षारोपणाची जबाबदारीही.
अजय कंडेवार,वणी :- त्याग, बलिदान आणि क्रांतिकारकांच्या प्रखर देशभक्तीचे स्मरण करून देणारा ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून शिरपूर पोलीस ठाणा तसेच शिंदोला दूरक्षेत्र (Outpost) येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळकरी चिमुकल्यांचा उपस्थितीत मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात (दि.१५ ऑगस्ट) रोजी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.Flag Hoisting and Tree Plantation at Shirpur Police Station. •Responsibility of tree protection and plantation in changing lifestyles.
शिरपूर पोलिस स्टेशनचा प्रांगणात वणी उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम वणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित जाधव व वणी वाहतूक शाखेचे प्रमुख सीता वाघमारे या अधिकाऱ्यांचा हस्ते ‘बॉटल पाम वृक्ष तसेच फळझाड
वृक्ष लावण्यात आले .सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत वृक्षांच्या संरक्षणाची व वृक्षारोपणाची जबाबदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. तसेच पर्यावरणाचे संरक्षण हे पुढील पिढीला समजावे म्हणून शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी वरिष्ठ अधिकारीव सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा स्तुत्यमय कार्यक्रम घेण्यात आला.पोलीस ठाण्याचे तिरंगा थीमवर सुशोभीकरण करण्यात आले होते.तसेच लहान मुलांना चॉकलेटस् तसेच अल्प उपहार देण्यात आला.प्रतिष्ठित नागरिकांना देखील अल्प उपहार देऊन त्यांना मान देण्यात आला.
यावेळी पोलीस स्टेशन शिरपूर येथील ठाणेदार गजानन करेवाड, PSI राम कांडुरे, सर्व पोलिस अंमलदार, होमगार्ड्स,सेवानिवृत्त कर्मचारी, स्थानिक नागरिक व प्रतिष्ठित उपस्थित होते.