Wani:- शिपाई पदभरती निष्पक्षपणे चौकशी करून योग्यतेनुसार परीक्षेत बसलेले परीक्षार्थीच्या योग्यतेनुसार निवड करून न्याय देण्यात यावां याकरीता वणी तालुक्यांतील नांदेपेरा येथील परीक्षाधारकांनी वणी गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली
सदर ही शिपाई पदाची भरती ३० डिसेंबर २०२४ रोजी पंचायत समिती वणीच्या माध्यमातून घेण्यात आली त्यावेळीं एकूण १० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.या निकालामध्ये नांदेपेरा गावातील रवींद्र देविदास ढवस यांना उत्तीर्ण करण्यात आले. याबाबत दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत पत्र लिहून सविस्तर माहिती दिली आहे असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात खालील मागण्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन चिकटे, तुषार खामंनकर, पवन कोडापे, अजय किन्हेकर, राहुल वांढरे, धीरज खामंनकर, प्रफुल पावले, प्रविण खैरे, साहिल ठमके यांनी केली आहे.