Ajay Kandewar,वणी :- तालुक्यातील खडडेमय रस्त्याचा चांगचाल उद्रेक होतांना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात रोष वाढत आहे. दि. 17 डिसेंबर रोजी वेळाबाई येथे संतप्त नागरीकांनी जक्काजाम आंदोलनाचे अस्त उगारले. वेळाबाई, मोहदा ते आबई फाटा रस्त्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला सरपंच संघटनेने पाठींबा दर्शवला.
तालुक्यात आगामी जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राजकीय खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे परीसरातील क्षतीग्रस्त झालेल्या रस्त्यांमुळे नागरीक भरडल्या जात आहे. ग्रामीण भागात राज्य मार्गावरील बहुतेक रस्त्यांची चाळणी झाली आहे. अपघातात लक्षणिय वाढ झाली आहे. प्रदुषणामुळे शेती पिके धोक्यात आली आहे.
वेळाबाई, मोहदा ते आबई फाटा रस्त्यावर मोठया प्रमाणात खडडे पडले आहे. यापुर्वी देखिल या रस्त्याच्या मागणीसाठी नागकरीकांनी आंदोलनात्मक भुमिका घेतली आहे. तोडगा निघत नसल्याने अखेर परीसरातील शेकडो नागरीक सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात एकवटल्याचे दिसुन आले. परीसरातील सरपंच संघटनने चक्काजाम आंदोलनाला पाठींबा दर्शवल्याने आंदोलनाची तिव्रता वाढल्याचे दिसुन आले.
मोहदा येथुन दिवस रात्र गिटटीची अवजड वाहनातुन वाहतुक केल्या जात आहे. वाहतुकीदरम्यान नियमांना तिलांजली दिल्या जात आहे. धुळ प्रदुषणाने संपुर्ण परीसराला कवेत घेतले आहे. परीवहन व सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भुमिका घेत असल्याने नागरीकांत रोष उफाळुन येत असल्याचे दिसत आहे. चक्काजाम आंदोलनात सरपंच अजय कौरासे, गीता उपरे, हेमंत गौरकार, प्रविण झाडे, अनिल देउळकर, नागेश धनकसार सह परीसरातील शेकडो नागरीक सहभागी झाले होते.