Tuesday, July 15, 2025
Homeझरीविनारिफ्लेक्टर वाहनचालकांना दणका........!

विनारिफ्लेक्टर वाहनचालकांना दणका……..!

शिरपूर पोलिस व वाहतूक शाखेने वसूल केला दंड.

अजय कंडेवार,वणी :- पोलीस स्टेशन शिरपूर तसेच वणी वाहतूक शाखा यांची संयुक्तपणे चारगाव चौकी तसेच बेलोरा फाटा येथे दिनांक 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत रस्त्यावर उभे राहून रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रक ,दुचाकी, कार यांचावर दंडात्मक कारवाई करून पोलिसांतर्फे “त्या…”बेशिस्त वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहीम राबवली.Bum to non-reflector drivers…….

वाहतूक प्रामुख्याने ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रक अशा वाहनांमधून केली जाते. ही वाहने रात्रीच्या वेळेस रस्त्याचा कडेला उभे असतात व इतर वाहन चालकांच्या सहज नजरेस पडावीत, संभाव्य अपघात टाळले जावेत यासाठी वाहनांवर रिफ्लेक्टर पोलीसातर्फे विशेष मोहीम राबवून लावले गेले.रात्री ट्रक वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिप्लेक्टर लावलेले दिसत नाहीत. रिफ्लेक्टर असले तरी त्याचा दर्जा राहिलेला नसतो अशा वाहनातून रात्री वाहतूक सुरु झाली की या वाहनांचा अंदाज सहसा येत नाही. परिणामी अपघाताचे धोके वाढतात. म्हणून अशा 10 वाहनावर मोटार वाहन कायदा कलम 104 प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच 12 मोठ्या ट्रक वाहनास पाठीमागील बाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टर पट्टी पोलीस विभागाचा वतीने लावण्यात आली .Bum to non-reflector drivers……..!

वाहनचालकांना देण्यात आल्या याही…..सूचना….! Drivers have also been given this…..notice….!वाहतूक करणारे ट्रक,‎ ट्रॅक्टर, कार चालकांना वाहतूक‎ नियमांचे पालन करण्याबाबत‎ प्रबोधन व जनजागृती करण्यात आली.‎ यावेळी ट्रकमधे मोठ्या‎ आवाजात गाणी लावू नये,‎ बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांना‎ पाठीमागे रिफ्लेकटर लावावे,‎ अतिवेगाने वाहन न चालवणे,‎ चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनाला‎ ओलांडून न जाणे, रस्ते वापरणाऱ्या‎ इतरांबाबत अपेक्षित काळजी घेणे,‎ मद्य सेवन न करता वाहन‎ चालवणे, वाहन चालवताना‎ भ्रमणध्वनीचा वापर न करणे,‎ लेनची शिस्त पाळावी, नेहमी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने‎ करावे, विरुद्ध दिशेने वाहन चालवू‎ नये, वाहन चालवताना वाहतूक‎ चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन‎ चालवावे, महामार्गावर धोकादायक‎ परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू‎ नये, वाहन चालवताना समोरील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन‎ वाहन चालवावे कारण समोरील‎ वाहनाच्या वेगाचा अंदाज न‎ आल्याने पाठीमागील वाहनाने‎ समोरील वाहनास धडक दिल्याने‎ घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये‎ वाढ झाली आहे, हे सांगून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मृंत्युंजयदूत योजनेबाबत माहिती‎ वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम तसेच शिरपूरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments