अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील कायर-नजिकचा विदर्भा नदी पात्राचा अद्याप लिलाव करण्यात आला नाही. हा घाट तालुक्यातील मलाई रेती घाटात येतो. यामुळे रेती चोरटयांची नजर या घाटावर असते. विशेषतः शिरपूर पोलिस याकडे तीक्ष्ण स्वरूपाचे नजर ठेवून रात्रभर गस्त करीत पोलिसांचे एक पथक पाळत ठेवूनही आहे परंतु या नदी पात्रातून रेती चोरण्यासाठी चोरटयांनी वेगळी शक्कल लढविली आहे.रात्री ट्रिप न मारता आता भर सकाळीं तीन -चार ट्रॅक्टरने रेतीची चोरी करण्यात येत आहे. तरीही वणी महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वेळीच चोरट्यांचा मुसक्या आवळण्यात यावे अशी रास्त मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यात रेती माफिया रेती चोरी करीतच आहे. यावर अंकुश आणण्यात महसूल विभागाचे मुख्य तहसिलदार सपेशल अपयशी होतांना दिसत आहे . विदर्भा नदीचा रेतीची चोरी करण्यासाठी “तीन जणांचा समुह” तयार करीत रेती चोरी करणे सुरू केले आहे अशी खमंग चर्चा आहे. जवळपास 4 ते पाच ट्रॅक्टरचा सहायाने रेती चोरी जोमात करण्यात येत आहे. रात्रीचा वेळी पोलिसांची गस्ती पाहून चोरटे रेकी करीत असल्याचें दिसून येतं आहे.
पोलिस पहाटे गेले की चोरटे सक्रीय होतांना दिसत आहे.याचा अर्थ “चोर – पुलीस का खेल”मात्र कार्रवाई शून्य होतांना दिसत आहे.परंतु, यात एक मात्र स्पष्ट असे की, वणी महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून कायर गावातील रेती चोरटे सक्रीय आहे कमी वेळात राजा बनण्याचे स्वप्न पाहणे सूरू आहे . रेती चोरीची अद्यापही कारवाई होत नसल्याचे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे आणि लाखोंचा चुना शासनाला लागत असल्याने शासनाचा हातात तुतारी मिळत असल्याचं चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे.रेती चोरट्यांनी गाव परिसरात धुमाकुळ घातल्याने ग्रामस्थ ट्रॅक्टरच्या आवाजाने चांगलेच त्रस्त झाले आहे.