•कोलेरा परिसरातील घटना
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कोलार पिंपरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना कोलेरा गावालगत दिनांक 27 नोव्हे. ला उघडकीस आली. रामदास पिदुरकर वय (५०), असे मृत गुराख्याचे नाव आहे.
रामदास पिदुरकर वय (५०)हा काल दिनांक 26 नोव्हेंबर रविवारला सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गुरे चारण्यासाठी कोलेरा गावाजवळील जंगलात गेला होता. परंतू सायंकाळ झाली तरीही तो घरी परतला नाहीं म्हणून त्यांचा नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केला व गावकऱ्यांनी शोध सुरू केला मात्र बेपत्ता असलेला रामदास अखेर दिसलाच नाहीं.असा अंदाज लावला जात होता की, दुपारचा सुमारातच झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने रामदास यांचा वर हल्ला करून त्यास ठार केले असावे. असे ग्रामस्थांनकडून बोलल्या जात होते. अखरे आज सकाळी नातेवाईक व गावकरी यांनी शिवारात शोध घेतला असता झुडुपात छिन्नविछिन्न पडून असलेल्या अवस्थेत मृतक रामदास आढळला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले.वनविभागाने घटनास्थळी भेट देली. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून शेतीची कामे करणे अवघड झाले आहे.