•पर्यावरण व खनिज संरक्षणाबाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
•34 वें खान पर्यावरण एव खनिज संरक्षण संपन्न.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शहरापासून सात किमी अंतरावरील वांजरी लाईम स्टोन खाण येथे 10 ते 16 डिसेंबरपर्यंत खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह पाळला जात आहे. या लाईम स्टोन खाणीत पर्यावरणाचे हे 34 वे वर्ष संपन्न होत आहे त्यानिमित्त, 15 डिसेंबरला दुपारी 2 वाजता वांजरी लाईम स्टोन खाणीत आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या खाणीचे निरीक्षण करून उपस्थित कर्मचाऱ्यांना खाण पर्यावरण व खनिज संरक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह अंतर्गत, कार्यक्रमाच्या सुरुवातीस आलेल्या निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके ,पिंजरकर साहेब व मस्के साहेब यांचे वांजरी लाईम स्टोन खाणीचे मालक अविनाश वारवतकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
अविनाश वारवतकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देताना टिपलेले एक क्षण…
वार्षिक खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह दरम्यान निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके ,पिंजरकर साहेब व मस्के साहेब यांनी लाईम स्टोन खाणीची पाहणी केली. तसेच कंपनीची सर्व कागदपत्रे, रजिस्टर व लेखी अहवालाची तपासणी केली. त्यानंतर तेथील उपस्थित कामगारांना पर्यावरण व खनिज संरक्षणासंबंधित माहिती सांगीतली व विशेषतः पर्यावरणाविषयी अती महत्वपूर्ण देताना सांगितले की, प्रदूषणामुळे जनसामान्याच्या आरोग्यावर येणाऱ्या काळातील परिणाम बघता सर्वांनी झाडे लावून निर्सगाचा समतोल राखून पर्यावरणाविषयी व किंबहुना प्रत्येक घराघरांतून पर्यावरणाचं बीजारोपण झाले पाहिजे असे मार्गदर्शन केले. वांजरी लाईम स्टोन खाणीची कामगिरी पाहून त्यांनी कंपनीची प्रशंसा केली. हे निरीक्षण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केले.
या कार्यक्रमाला उपस्थित निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके ,पिंजरकर साहेब व मस्के साहेब,वांजरी लाईम स्टोनचे मालक अविनाश वारवतकर,वांजरी लाईम स्टोन माईनचे खाण प्रबंधक विंचूरकर ,नेट-सिन्हा, ब्लास्टर गजानन किन्हेंकर तसेच वांजरी लाइम स्टोनचे कर्मचारी वेंकटराव अंधेवार ,समय्या कोंकटवार,सुनिल कोहळे इतर खाण कामगार उपस्थित होते.वार्षिक खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी व्यस्थापक,आदी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतली. संचालन इंजि.गुलाब गेडाम यांनी केले तर आभार खाण प्रबंधक विंचूरकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन प्रतिज्ञेने करण्यात आली