Ajay Kandewar,Wani:- वणी महसूल विभागाच्या कार्यवाहीची जराही भीती न बाळगता वाळू तस्कर रेती घाटावरून सर्रास रेतीची चोरी करून ती काळ्या बाजारात विकत आहेत. त्यामुळे वणी महसूल विभागाच्या कार्यवाहीचा वाळू चोरट्यांना जराही धसका घेतल्याचे दिसत नाही.वणी एस.टी डेपोत लावलेल्या रेतीने भरलेल्या दोन ट्रकवरून दिसून येतं आहे.

महसूल विभागाने या दोन दिवसांत रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले आहेत. हे दोन्ही ट्रक वणी आगारात लावण्यात आले आहेत. कंपनीच्या रेती वाहतुकीच्या पासवर सर्रास रेती तस्करी सुरु आहे .ही रेती तस्करी रोखण्यात त्या “विवेक बुध्दीचा” खदाडपणात करण्यात आलेल्या उपाययोजना “सपेशल फेल” होत आहे.यामुळें वणी तालुक्यांत तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. आता तर या “विवेकबुद्धीचा” मदतीने दुसऱ्याही जिल्ह्यातील रेती चोरटे येऊन वणी तालुक्यात रेती तस्करी करतांना दिसत आहेत. त्यामुळे रेती तस्करीवर रोख लावण्यात थोडाफार वणी प्रशासन गाडी पकडून “थोडा फार दंड लावून”, “मुख्य मालकाला” या कारवाईपासून दूर ठेवून वाहन “चालकावर थातुरमातुर कारवाई” करुन कारवाई करीत असल्याचा मोठ्या बोंबा करीत आहे आणि थोडाफार दंड लावून पुन्हा गाडी वापस करून “कामं चलने दो….. फिर रेती के ट्रिपा से कमाओ अशी चर्चा सूरू आहे .
•” इनके ही पुरे हाथ खून से रंगे हैं……..”
शासनाची हाजारो ब्रास रेती चोरी जाते आणि या अधिकाऱ्यांना कानो कान खबर नसणे म्हणजे प्रशासन मूंग गिळून असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होते. यावर वणी तहसिलदार यांनी जातीने लक्ष घालून या सपेशल Fail तलाठी,मंडळाधिकारी यांचावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे तेव्हाच अन्य कर्मचारी यांना भिती निर्माण होईल. असे न झाल्यास ” इनके ही पुरे हाथ खून से रंगे हैं…”ऑर इसमे “वो खादाड ” भी हैं,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशीही शहरात चर्चा आहे. तसेच रेती चोरट्यांचे फक्त गाड्या पकडण्यात धन्यता मानत बोंबां मारण्यात मग्न आहे. चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आगेकूच का करताहेत हे “साहेब लोकं....”अस म्हटल्या जाते.

